scorecardresearch

“शाहरुख-सलमानच्या नावाने रडत होता म्हणून घरी बसला”; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गोविंदावर मोठा आरोप; म्हणाले, “डेव्हिड धवनमुळे…”

गोविंदाच्या करिअर आणि काम करण्याच्या पद्धतीवर दिग्दर्शकांनी साधला निशाणा

govinda
प्रसिद्ध दिग्दर्शकाचा गोविंदावर मोठा आरोप

बॉलीवूड अभिनेता गोविंदा नेहमी चर्चेत असतो. नव्वदच्या दशकात गोविंदानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले. अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांची गोविंदाला चित्रपटात घेण्यासाठी रांग लागायची. मात्र, कालांतराने चित्र बदललं आणि गोविंदाला चित्रपट मिळणं कमी झालं. नुकत्याच एका मुलाखतीत प्रसिद्ध दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी गोविंदाच्या करिअरबाबत मोठं विधान केलं आहे. एवढंच नाही तर गोविंदाच्या काम करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा- ‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

amit-rai-omg2
‘OMG 2’चे दिग्दर्शक यांनी ‘CBFC’ला म्हटलं ढोंगी; म्हणाले, “रॉकी और रानीमधील किसिंग…”
dunki-prepone
शाहरुख खानच्या ‘डंकी’ची रिलीज डेट बदलणार? प्रभासच्या चित्रपटामुळे निर्मात्यांनी तारीख बदलल्याची चर्चा
sachin_sawani
प्रसिद्ध मराठी गायिकेला मिळाली सचिन तेंडुलकरसमोर गाण्याची संधी, अनुभव शेअर करत म्हणाली, “ते आणि अंजली खूप…”
shahrukh-khan-fees
‘जवान’च्या यशानंतर शाहरुख खानने वाढवले त्याचे मानधन; जवळच्या व्यक्तीने दिलं स्पष्टीकरण

निहलानी म्हणाले, “हे सगळं डेव्हिड धवन यांनी सुरू केलं होतं. जेव्हा मी माझ्या चित्रपटांमध्ये अनिल कपूरला घेतलं तेव्हा डेव्हिड धवन यांनी माझ्याविरोधात गोविंदाचे कान भरले. परिणामी गोविंदानं माझे चित्रपट अर्ध्यावर सोडले. परिणामी मला ते चित्रपट दुसऱ्या अभिनेत्याबरोबर पूर्ण करावे लागले. एवढंच नाही, तर गोविंदा प्रत्येक वेळी आपलं दुखणं घेऊन मीडियासमोर जात होता. तो सलमान आणि शाहरुखच्या नावानंही नेहमी रडायचा. याचा परिणाम त्याच्या करिअरवर झाला आणि आज बघा तो घरी बसला आहे. “

हेही वाचा- Soha Ali Khan Birthday: वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

८० व ९० च्या दशकात गोविंदाचं नाव आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये घेतलं जायचं. एकाच वेळी त्याच्याकडे ३० ते ४० चित्रपट असायचे. मात्र, ९० च्या दशकानंतर गोविंदाची जादू ओसरू लागली. त्याच्यामागे मुख्य कारण होतं ते म्हणजे त्याचं सेटवर उशिरा पोहोचणं. प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर तो तासन् तास उशिरा पोहोचायचा. परिणामी निर्मात्यांनी त्याला चित्रपटांत घेणं बंद केलं. पार्टनर या चित्रपटात सलमान खानच्या मदतीनं गोविंदानं बॉलीवूडमध्ये पुन्हा कमबॅक केलं; पण त्याचा त्याला जास्त फायदा झाला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Govinda did rona dhona about salman khan shahrukh khan claims producer pahlaj nihalani dpj

First published on: 04-10-2023 at 11:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×