गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. गोविंदा कोमल राणीबरोबर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेल्यानंतर दिव्या खोसला कुमारने सुनीता आहुजाला पाठिंबा दिला आणि कोमल राणीवर टीका केली. कपाळावर कुंकू लावून कोणाला मूर्ख बनवताय? कमीत कमी स्वतःच्या फायद्यासाठी किंवा अजेंड्यासाठी आपल्या धर्माचा वापर करणं बंद करा. तुम्हाला कुंकवाचं महत्त्व तरी समजतं का? ती एका विवाहित हिंदू स्त्रीची सर्वात पवित्र आणि शक्तिशाली ओळख आहे, असं दिव्या खोसला कुमारने म्हटलं होतं. आता कोमल राणीने तिच्यावर पलटवार केला आहे. आमच्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा का मांडलाय? असा सवाल तिने केला आहे.

“मी पाहतेय की इतक्यात की काही कलाकार उघडपणे गोविंदाजी आणि माझ्या वैयक्तिक आयुष्यावर आणि आमच्या चारित्र्यावर बोलत आहेत. पण जेव्हा दहशतवाद, राजकारण, अभिनेत्यांचा मृत्यू किंवा एखाद्या अभिनेत्याचे एकापेक्षा जास्त लग्न अशा गंभीर मुद्द्यांचा प्रश्न येतो, तेव्हा या लोकांना इतक्या ठामपणे मतं मांडताना मी कधीच पाहिलं नाही. मग अचानक आमचं वैयक्तिक आयुष्य असा सार्वजनिक तमाशा का बनलंय, की प्रत्येकाला त्यावर बोलण्याचा अधिकार वाटतोय?” असं कोमल राणीने म्हटलंय.

govinda-komal-rani-swarnakar-divya-khosla-kumar-controversy
कोमल राणीची पोस्ट (सौजन्य- इन्स्टाग्राम)

स्वतःला लाज वाटत नाही का? कोमल राणी

पुढे ती म्हणाली, “माझ्या ‘हीरो’बरोबर गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाणं आणि माझ्या आगामी ‘रूपा’ चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना करणं, हे कधीपासून इतरांसाठी लाजीरवाणी गोष्ट, राष्ट्रीय मुद्दा किंवा ‘दिखावा’ झालं? आणि याच अभिनेत्री जेव्हा स्वतःच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःच्या पुरुष सहकलाकारांबरोबर जातात, तेव्हा त्यांना स्वतःला असं करताना लाज वाटत नाही का?”

आम्ही आमच्या अफेअरची घोषणा केलेली नाही – कोमल राणी

“आम्ही आमच्या अफेअरची घोषणा केलेली नाही, तर आमच्या ‘रूपा’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. मग आमचं एकत्र दिसणं हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नसून वैयक्तिक नातं दाखवण्यासाठी आहे, हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही एकत्र काम करत आहोत आणि यापुढेही एकत्र दिसू. याचा कोणाला त्रास होत असेल, तर त्यांनी खुशाल जळावं,” असं ती म्हणाली.

govinda-komal-rani-swarnakar-divya-khosla-kumar-controversy
कोमल राणीची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्राम)

चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्री, ज्यांचं करिअर आता संपल्यात जमा आहे, ज्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत, त्यांच्याकडे आता फक्त जुन्या ब्रँड टॅग्सपलीकडे काहीही उरलेलं नाही. त्या दुसऱ्यांच्या वादात पडून आणि स्वतःला कसंबसं चर्चेत ठेवून टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहेत.

नको नको ते बोलली कोमल राणी स्वर्णकार

“ज्यांचे स्वतःचे संसार मोडत आहेत आणि स्वतःचं नातं जपू शकत नाही, अशा महिलांकडून मला सिंदूर, लग्न किंवा आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरांचे धडे घेण्यात अजिबात रस नाही. अशा महिलांना मी मला जज करण्याच्या लायकीचं समजत नाही. खासकरून अशा महिला ज्या रात्रभर दारू पितात, इतर पुरुषांबरोबर अनेक अफेअर्स करतात, अगदी उतारवयातही तीन-तीन पुरुषांसोबत ‘वन-नाईट स्टँड’ची स्वप्नं पाहणाऱ्या आणि ज्यांच्यासोबत आयुष्यभर राहिल्या व ज्यांचा फायदा घेतला, त्याच नवऱ्यांचा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जाहीर अपमान करणाऱ्या लोकांचा आदर करतात आणि त्यांना पाठिंबा देतात,” असं कोमल राणी म्हणाली.

govinda-komal-rani-swarnakar-divya-khosla-kumar-controversy
कोमल राणी स्वर्णकार (फोटो- इन्स्टाग्राम)

“हे लोक मला चांगली व्यक्ती मानतात की वाईट, याने मला खरंच काहीही फरक पडत नाही. मला वाटतं की या सगळ्या माळेचे मनी आहेत. यांची टोळी आहे. ज्या स्वतःच्या मोडलेल्या संसाराचा राग दुसऱ्यावर काढत आहेत. माझ्या नावाचा वारंवार वापर करून स्वतःला चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न बंद करा.”

govinda-komal-rani-swarnakar-divya-khosla-kumar-controversy
कोमल राणी स्वर्णकारची पोस्ट

“तुमचा आदर तुमच्या स्वतःच्या हातात असतो,” ही म्हण खरी आहे. त्यामुळे अशा महिलांनी आपल्या मर्यादा ओळखून इतरांना इतकं भडकवू नये की त्यांची स्वतःची भूतकाळातील काळी कृत्ये समोर येतील,” असा इशारा कोमल राणीने दिला.