Govinda Lalbaugcha Raja Darshan Komal Rani Swarnkar: बॉलीवूड अभिनेता गोविंदाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. मंगळवारी त्याने भक्तिभावाने गणरायाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण, यावेळी गोविंदा एकटा नाही तर तो त्याची सहकलाकार अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारबरोबर दर्शन घेण्यासाठी आला होता. गोविंदा व राणी यांनी एकत्रित लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.
गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार हे एकत्र लालबागच्या गणपतीच्या मांडवामध्ये पोहोचले. प्रचंड गर्दीतूनही दोघांनी एकत्र दर्शन घेतल्याचे दिसून आले. यावेळी तिने लाल रंगाची अतिशय सुंदर अशी साडी नेसली होती. त्यासह हेवी मेकअप व ज्वेलरीसह तिने लूक पू्र्ण केला होता. गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांचे लालबागच्या राजाच्या दर्शनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गोविंदाच्या लालबागच्या दर्शनावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
नेटकऱ्यांनी गोविंदा व कोमल राणी स्वर्णकार यांनी एकत्र लालबागचे दर्शन घेतल्याने कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “यापेक्षा सुनीता खूप चांगली आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “सुनीता बरोबर बोलत होत्या, गोविंदा या वयामध्ये हे काय करतोय?” तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सुनीता खूप बोलत असतील, पण कधीच खोटं बोलत नाहीत.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “गोविंदा फक्त त्याच्या पुढच्या सिनेमाचं प्रमोशन करतोय.”
गोविंदा व सुनीता एकाच दिवशी लालबागच्या दर्शनाला
विशेष म्हणजे, याच दिवशी मंगळवारी सकाळच्या सुमारास गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले होते. भक्तिभावाने त्यांनी गणारायाची आराधना केल्याचे दिसून आले. पण, यावेळी त्या एकट्याच गणपतीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्याच दिवशी संध्याकाळी गोविंदा हा कोमल राणी स्वर्णकारसह लालबागमध्ये दिसल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
मागील काही काळापासून गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांचे वैवाहिक आयुष्य चर्चेत आले आहे. यापूर्वी ते घटस्फोट घेणार असल्याचे समोर आले होते. त्यानंतर सुनीता यांनी घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला असला तरी गोविंदाचे त्याची सहकलाकार कोमल राणी स्वर्णकारबरोबर कथित अफेअर असल्याचे आरोप केले होते, त्यामुळे कोमल राणी स्वर्णकार चर्चेत असून आता तिने गोविंदाबरोबर लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे.
