Govinda Get’s Threat Calls Says Manager Shashi Sinha : बॉलीवूड अभिनेता गोविंदा कुठल्या ना कुठल्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. अशातच त्याच्या मॅनेजरने अभिनेत्याला जीवे मारण्याच्या धमक्या येतात, असं म्हटलं आहे. परंतु, त्याच्याकडे स्वत:ची बंदूक असल्यानं त्याच्यावर झालेल्या हल्ल्यातून त्याची सुटका झाल्याचंही म्हटलं आहे. गोविंदाचा मॅनेजर नेमकं काय म्हणाला याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हानं गोविंदाला येत असलेल्या धमक्याा आणि त्याच्यावर झालेल्या हलल्याबद्दल ‘एएनआय’सी संवाद साधताना सांगितलं आहे. ते म्हणाले, “त्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असतात. जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला होता. तेव्हा देवाच्या कृपेनं त्याच्याकडे बंदूक होती. त्यामुळे त्यानं स्वत:ची सुटका करून घेतली. नाही तर देव जाणे काय झालं असतं. मी पहाटे ४ वाजता त्याच्याकडे गेलो आणि आम्ही एफआयआर दाखल केली. त्या रात्री काय झालं याचा आमच्याकडे व्हिडीओही आहे.”
शशी यांनी यावेळी ते नेमक्या कोणत्या हल्ल्याबद्दल बोलत आहे हे स्पष्ट केलेलं नाही. तर त्यांनी गोविंदा स्वत:चा बचाव करत असताना त्यालाच दुखापत झाल्याचंही सांगितलं. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये गोविंदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. कारण- तो त्याची बंदूक साफ करताना चुकून स्वतःच्या पायावर गोळी झाडल्याचं सांगितलं गेलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तो मुंबईतील आपल्या घरात असताना आणि विमानतळासाठी निघणार असताना त्याच्या शस्त्रातून अपघातानं गोळी निघाली आणि त्याला पायाला जखम झाली.
गोविंदाचा मॅनेजर शशी यांनी सांगितलं की, गोविंदा सकाळी ४:४५ वाजता विमानतळासाठी निघणार होता. तो कोलकाताला जाणाऱ्या ६ वाजताच्या फ्लाइटसाठी निघणार होता. त्याच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर त्यानं कपाटात ठेवताना अपघातानं दाबला गेला. बंदूक चुकीनं फायर झाली आणि गोळी त्याच्या पायाला लागली. पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवलेली नाही.
शिल्पा शेट्टी सुनीता आहुजाबद्दल काय म्हणालेली?
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार गोविंदानं या अपघातानंतर त्याची प्रकृती आणि परिस्थिती चिंताजन नसल्याची माहिती दिलेली. त्यानं क्रिटीकेअर रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या पायातील गोळी यशस्वीपणे काढली असून, तो त्यांचा आभारी असल्याचं सांगितलेलं. यावेळी त्यानं शिल्पा शेट्टी जेव्हा त्याला रुग्णालयात भेटायला गेलेली तेव्हा तिनं केलेला विनोदही सांगितला. त्यावेळी त्याने, शिल्पा त्याची विचारपूस करण्यासाठी आल्यानंतर तिनं घरगुती भांडणामुळे सुनीता यांनी त्याच्यावर गोळी झाडली असेल, असा विनोद केला होता.

