Sunita Ahuja on drinking alcohol : अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या नेहमीच त्यांच्या बिनधास्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ‘लाफ्टर शेफ्स ३’मध्ये आपल्या खास शैलीने त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक बोलणे हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. त्यांनी पती गोविंदा याच्या गोळीबार प्रकरणावर उघड भाष्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते. यानंतर आता सुनीता त्यांच्या दारूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. एका पॉडकास्टमध्ये मी कोणी साधू-संत नाही आणि प्रमाणामध्ये दारू पिणे काही वाईट नाही असे वक्तव्य त्यांनी केले. दारू पिण्यावर ट्रोल करणाऱ्यांना सुनीता आहुजा यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पॉडकास्टमध्ये दिलं उत्तर

सुनीता आहुजा यांची मुलाखत चर्चेमध्ये राहत असते. त्या सिनेविश्वाबद्दल करत असलेले खुलासे आणि परखड भाष्य यामुळे त्या प्रेक्षकांना भावतात. रिॲलिटी शोमधून त्या घराघरांत पोहचल्या आहेत. सुनीता आहुजा यांनी एकदा एका व्हिडीओमध्ये स्पष्टपणे सांगितले होते की, घरातील त्यांची सर्वात आवडती जागा दारू पिण्याची आहे. त्यांनी असेही सांगितले की, त्या दारू पितात आणि धार्मिक पूजापाठसुद्धा करत असतात. जेव्हा एका पॉडकास्टमध्ये सुनीता यांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सडेतोड उत्तर दिले.

मी काही साधू-संत नाही – सुनीता

तसेच ‘आयुष्यामध्ये काही हौस आणि इच्छा असतात ना? आता काय सर्व इच्छा मारून टाकायच्या का? मला कोणी खायला घालत आहे किंवा प्यायला देत आहे असं तर नाही. डॉक्टरसुद्धा सांगतात की दोन पेग पिणे हे हृदयासाठी चांगले असते. पूजापाठ मी दिवसा करते. मी रोज बसून थोडी दारू पिते. आयुष्यामध्ये समतोल असला पाहिजे; मी काही साधू-संत नाही की हातामध्ये कमंडलू घेऊन बसेन, मी सुद्धा एक माणूस आहे,’ अशी प्रतिक्रिया सुनीता आहुजा यांनी दारू पिण्याबाबत दिली.

किसी के बाप की थोड़ी पीती हूं’ – सुनीता

सुनीता आहुजा मागील वर्षी जेव्हा अभिषेक व्यास यांच्या पॉडकास्टवर आल्या, तेव्हा त्यांना दारू पिण्याबद्दल विचारण्यात आले. मद्यपान करण्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर सुनीता आहुजा यांनी ‘किसी के बाप की थोड़ी पीती हूं’ असे म्हणत सडेतोड उत्तर दिले. सुनीता आहुजा म्हणाल्या की, ‘मी पूजा-पाठ करते याचा अर्थ असा होत नाही की मी साधू-संत झाले आहे. काही लोक तर मागे लपून दारू पितात, मी तर समोर सांगून पिते,’ असे मत सुनीता आहुजा यांनी व्यक्त केले.

सुनीता आहुजा या चित्रपटसृष्टीपासून लांब राहिल्या असल्या तरी नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. टीव्ही शोमधून त्यांनी लोकप्रियता मिळवली असून वैयक्तिक आयुष्यामुळे त्या चर्चेत असतात. सुनीता यांनी कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यावरील वक्तव्य्यांनी सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यांचे मन्नत विथ सुनीता नावाचे यूट्यूब चॅनेल असून त्या अनेकदा पॉडकास्टमध्ये दिसून येतात.