Govinda’s Viral video: सोशल मीडियावर जसे नवनवीन व्हिडीओ, विविध कंटेट पाहायला मिळतात, तसेच जुन्या चित्रपटांतील काही व्हिडीओ, गाजलेले डायलॉग, जुनी गाणी, प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारे डान्स, जुन्या मुलाखतींचे व्हिडीओ पाहायला मिळतात.
आता असाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ गोविंदाचा आहे. गोविंदाने बडे मियां छोटे मियां या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
गोविंदा आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा १९९८ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटात गोविंदा व अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका पाहायला मिळाली. अॅक्शन, डायलॉग आणि विनोदाचे अचूक टायमिंग यामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटातील बडे मियाँ छोटे मियाँ गाणेदेखील मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. याच गाण्यावर गोविंदाने एका रिअॅलिटी शोमध्ये डान्स केला होता.
गोविंदाचा हा व्हायरल व्हिडीओ सुपर डान्सर ५ मधील आहे. या शोमध्ये अभिनेत्याने पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी गोविंदाने शोमधील स्पर्धक सोमांश डंगवालबरोबर बडे मियाँ छोटे मियाँ या गाण्यावर डान्स केला होता. दोघांची ऊर्जा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी शिट्ट्या वाजवत त्यांचे कौतुक केले होते.
नेटकरी म्हणाले…
आता हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असला तरी प्रेक्षक या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. एकाने लिहिले, “जुने ते सोने”, असे म्हणत गोविंदाचे कौतुक केले होते. तर आणखी एकाने लिहिले, “माझा आवडता कलाकार”, एकाने लिहिले, “लहानपणापासूनच मी तुमच्या कामाचा चाहता आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “माझा सुपरहिरो” अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.



गोविंदाच्या कामाबद्दल बोलायचे तर त्याने १९८६ ला इल्जाम या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर अॅक्शन आणि डान्स हिरो म्हणून अभिनेत्याची ओळख निर्माण झाली. १९९० च्या दशकात अभिनेत्याने एकापेक्षा एक विनोदी चित्रपटांत काम केले. त्यामध्ये ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर वन’, ‘हीरो नंबर वन’ आणि ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
सध्या गोविंदा बऱ्याच काळापासून बॉलीवूडपासून दूर आहे. २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या रंगीला राजा चित्रपटात तो दिसला होता. लवकरच अभिनेता ६ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
