बॉलीवूडचे कलाकार अनेकविध कारणांमुळे सतत चर्चेत असतात. कलाकारांची जितकी चर्चा होते, तितकीच त्यांच्या कुटुंबीयांचीदेखील चर्चा होताना दिसते. आता बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता गोविंदा यांच्या पत्नी सुनीता अहुजा यांनी एका पॉडकास्टमध्ये केलेले वक्तव्य चर्चेत आहे.

सुनीता अहुजा यांनी ‘टाइम आऊट विथ अंकित’ या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. आई म्हणून त्यांची भूमिकादेखील सांगितली आहे. त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीचे निधन झाल्याचेदेखील त्यांनी सांगितले. याबरोबरच मुलांना त्यांनी कधी एकटे सोडले नसल्याचेदेखील सुनीता अहुजा यांनी या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.

Om Puri did not have money to buy mangalsutra recalls wife Nandita Puri
“त्यांच्याकडे मंगळसूत्र घ्यायलाही पैसे नव्हते”, ओम पुरी यांच्या दुसऱ्या पत्नीने सांगितला कठीण काळ; म्हणाली, “त्यांनी मला…”
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Rajkummar Rao and Patralekhaa Love Story
“तो खूप विचित्र…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला त्यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा; म्हणाली, “मुंबई पुणे प्रवासात त्यानेच…”
bigg boss marathi abhijeet sawant wife Shilpa first post after she visit bb house
‘बिग बॉस’च्या घरात अभिजीतची भेट घेतल्यावर पत्नी शिल्पाची पहिली पोस्ट! म्हणाली, “इतक्या दिवसांनंतर…”
Shibani Dandekar praised husband farhan akhtar first wife
मराठमोळ्या शिबानी दांडेकरने पतीच्या पहिल्या बायकोचं केलं कौतुक; सावत्र मुलींबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली, “त्या खूप…”
IND vs BAN R Ashwin father predicted that his son will do something special
IND vs BAN : ‘माझा मुलगा आज नक्कीच…’, अश्विनच्या वडिलांनी आधीच केले होते भाकीत; दिनेश कार्तिकचा खुलासा
IND vs BAN Rohit Sharma praises Rishabh Pant
IND vs BAN : ऋषभ पंतने स्फोटक खेळीने जिंकले कर्णधाराचे मन, रोहित शर्मा कौतुक करतानाचा VIDEO व्हायरल
Bigg Boss Marathi Season 5 Vaibhav Chavan says My game fell short after evicted
“…त्याच्यामुळे मी बाहेर आहे”, एलिमिनेट झाल्यानंतर वैभव चव्हाणचं वक्तव्य, म्हणाला…

काय म्हणाल्या सुनीता अहुजा?

या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलाचे यशवर्धन याचे नेहमी का लाड केले याबद्दल सांगताना त्यांनी म्हटले, “यशचे थोडे जास्त लाड झाले, कारण तो टीनापेक्षा आठ वर्षांनी लहान आहे. यशच्या आधी मला दुसरी मुलगीही होती, पण ती प्रीमॅच्युअर होती. तिचे निधन झाले तेव्हा ती तीन महिन्यांची होती; तिचे फुफ्फुस विकसित झाले नव्हते, त्यामुळे मी यशला खूप लाडात वाढवले. माझ्या मनात भीती होती, त्यामुळे त्याची फार काळजी घेत वाढवले. आता मला त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या लागतात, पण ठीक आहे”, असे सुनीता यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “त्या दोघांबरोबर मी फार कडक शिस्तीने वागते. पण, आता ते दोघेही मोठे झाले आहेत. मात्र, ते जेव्हा शाळेत होते त्यावेळी नोकरांबरोबर मी त्यांना कधीच एकटे सोडले नाही. मी स्वत: त्यांना शाळेत सोडायला जायचे आणि त्यांना आणायला जायचे.”

हेही वाचा: “…त्याच्यामुळे मी बाहेर आहे”, एलिमिनेट झाल्यानंतर वैभव चव्हाणचं वक्तव्य, म्हणाला…

गोविंदाविषयी बोलताना सुनीता म्हणतात, “मी बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला असताना पहिल्यांदा गोविंदाला भेटले होते. पण, त्यावेळी आमचे अफेअर नव्हते. तो विरारचा आणि मी पाली हिलला राहणारी होते, आम्ही प्रेमात पडू आणि लग्न करू असे कोणाला वाटले असेल?”

दरम्यान, गोविंदा आणि सुनीता यांनी १९८७ ला लग्नगाठ बांधली. त्यांना टीना आणि यशवर्धन ही दोन मुले आहेत. गोविंदाने अनेक चित्रपटांतून वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचा आजही मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.