Watch Bollywood’s This 90s Horror-Thriller Film : बॉलीवूडमध्ये विविध धाटणीचे चित्रपट बनत असतात. पण, सध्या हॉरर आणि थ्रिलर या जॉनरवरच्या कलाकृतींना प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, आता ९० च्या काळात ज्याप्रकारे हॉरर चित्रपट बनवले जायचे तसे बनवले जात नाहीत.

आता मेकर्स हॉरर चित्रपटांमध्ये कॉमेडीचाही तडका देतात. परंतु, तुम्हाला जर ९० च्या काळातील थरारक असा हॉरर चित्रपट पाहायचा असेल तर आम्ही तुम्हाला एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. १९६५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं नाव आहे ‘गुमनाम.’ हा ९० च्या काळातील एक भयानक हॉरर चित्रपट आहे. ‘गुमनाम’ भारतीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट रहस्यमय आणि थ्रिलर चित्रपटांपैकी एक मानला जातो. राजा नवाथे दिग्दर्शित आणि एन. एन. सीपी निर्मित या चित्रपटात मनोज कुमार, नंदा, महमूद, हेलेन, मदन पुरी यांसारखे काही कलाकार झळकले होते. चला तर या चित्रपटाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

चित्रपटात आठ अनोळखी लोकांना लॉटरी जिंकल्यानंतर एका रहस्यमय ठिकाणी बोलावलं जातं. तिथे त्यांना आलिशान महाल दिसतं. यामध्ये बटलर (महमूद) एकटाच राहत असतो. परंतु, या कथेत मोठं वळण तेव्हा येतं, जेव्हा या लोकांपैकी एक एक जण मृत्युमुखी पडतो. या चित्रपटातील प्रत्येक पात्राचा भूतकाळ असतो. मनोज कुमार (आनंद) या चित्रपटात फ्लाईट अटेंडेंट म्हणून इतर सदस्यांबरोबर फिरत असतात. नंदा (आशा) चित्रपटाची मुख्य नायिका आहे. परंतु, तिचा एक भूतकाळ असतो. महमूद (स्वयंपाकी) या चित्रपटातील महत्त्वाचं पात्र आहे. त्याचं ‘हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले है’ हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. महमूद चित्रपटात भय आणि कॉमेडीचं अचूक समीकरण सादर करतो.

उत्तम सिनेमॅटोग्राफी

१९६५ च्या दरम्यान बनलेल्या या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी त्या काळाच्या तुलनेत बऱ्यापैकी ॲडव्हान्स आहे. चित्रपटात लो की लाइटिंगचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटातील काही दृश्यांमधील चाळीतील मोठी सावली आणि पात्रांच्या अर्ध्या चेहऱ्यावरील अंधार प्रत्येक पात्राचा एक भूतकाळ असल्याचं दाखवतं. हा चित्रपट फक्त एक मर्डर मिस्टरी नाही तर ह्यूमन सायकॉलॉजिकलचा एक प्रयोगही आहे. चित्रपटात माणूस भीतीमुळे कुठून कुठे जाऊ शकतो आणि एकमेकांवर शंका घेेतल्याने त्याचं किती नुकसान होऊ शकतं हे पाहायला मिळतं.

चित्रपटातील गाण्यांचं महत्त्व

एरवी चित्रपटातील गाणी विरंगुळा, कलाकारांमधील केमिस्ट्री हे दाखवण्यासाठी असतात, परंतु या चित्रपटातील गाणी कथानकाला पुढे घेऊन जातात. ‘गुमनाम है कोई’ हे गाणं एक संदेश देऊ पाहत असतं. ‘हम काले हुए तो क्या हुआ दिलवाले है’ हे गाणं प्रेक्षकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आहे. यादरम्यान चित्रपटातील महमूदचं पात्र हलक्या फुलक्या वातावरणाची निर्मिती करतं, जेणेकरून पुढे होणाऱ्या खुनांमुळे प्रेक्षकांना अधिक धक्का बसतो.