Hansika Motwani Net Worth : हल्ली अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या अवघ्या काही वर्षांनंतरच घटस्फोट घेताना दिसत आहेत. अशातच आता मनोरंजनविश्वातील अजून एका लोकप्रिय अभिनेत्रीच्या घटस्फोटाची चर्चा सुरू आहे, ती अभिनेत्री म्हणजे हंसिका मोटवानी. हंसिका हिने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांत कामं केली आहेत.

हंसिकाने तिच्या सौंदर्याने आणि सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. परंतु, सध्या अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा लग्नाच्या अवघ्या तीन वर्षांनंतर घटस्फोट झाल्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे तिच्या घटस्फोटाबद्दल अनेक जण चर्चा करताना दिसत आहेत.

हंसिका मोटवानी हिने आतापर्यंत अनेकदा तिच्या कामामुळे अनेकांचं लक्ष वेधलं आहे. तिने अनेक लोकप्रिय अभिनेत्यांसह काम केलं आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, हंसिका एका चित्रपटासाठी किती मानधन घेते आणि तिची एकूण संपत्ती किती आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…

हंसिकाची नेटवर्थ किती?

माध्यमांच्या वृत्तानुसार हंसिका मोटवानीची एकूण संपत्ती ३७ कोटी रुपये इतकी आहे. तिच्या कमाईचं मुख्य साधन चित्रपट आहेत. त्यानंतर ब्रँड एंडोर्समेंट आणि विविध व्यवसाय आहेत. अभिनयाव्यतिरिक्त हंसिकाने इतर गोष्टींमध्येही गुंतवणूक केली आहे. ती रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करते, त्यामुळेच तिच्या कमाईचे वेगवेगळे स्त्रोत आहेत.

एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ पैसे

हंसिका मोटवानी चित्रपटांतून मोठ्या प्रमाणात कमाई करते. माध्यमांच्या वृत्तानुसार ती एका चित्रपटासाठी ८० लाख ते १ कोटी रुपये मानधन आकारते. हंसिकाला खरी ओळख मिळाली ते टीव्ही शो ‘शाका लाका बुम बुम’मुळे. यानंतर तिने ‘कोई मिल गया’ या चित्रपटात काम केलं. त्यानंतर हंसिका काही दाक्षिणात्य चित्रपटांतून झळकायला लागली आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

हंसिकाकडे आहे महागड्या गाड्यांचं कलेक्शन

सांगितल्याप्रमाणे चित्रपटांव्यतिरिक्त हंसिका जाहिराती आणि इतर व्यवसायांमधूनही कमाई करते. माधम्यांच्या वृत्तानुसार ती या सर्व कामांमधून २० ते २५ लाख रुपये कमावते. यासह ती काही व्यावसायिक प्रोजेक्टचाही भाग आहे. हंसिकाला महागड्या गाड्यांचीही खूप आवड आहे. तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्या गाड्यांच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर तिच्याकडे रोल्स रॉयल्स फैंटम आणि मर्सडिज-बेंझ एस-क्लाससारख्या गाड्यांचा समावेश आहे. २०२४ मध्ये तिने बीएमडब्ल्यू ६३० आई जिटी गाडी स्वत:ला भेट दिलेली, ज्याची किंमत जवळपास ७५.५० लाख रुपये इतकी आहे. काळानुसार हंसिकाने तिच्या संपत्तीची इतर गोष्टीत गुंतवणूकही केल्याचं म्हटलं जातं.