Hanuman Ansh box office collection day 30: सध्या सिनेमागृहांत अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये कियारा अडवाणी व यश यांची प्रमुख भूमिका असलेला टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स, तसेच मिर्झापूर, हनुमान अंश अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. या सर्व सिनेमांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त भारतातच नाही, तर जगभरातून या सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
‘हनुमान अंश’ सिनेमाने ओलांडला १०० कोटींचा टप्पा
या सगळ्यात हनुमान अंश या सिनेमाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. या सिनेमांनी किती कमाई केली आहे, याबद्दल जाणून घेऊ…
हनुमान अंश हा सिनेमा प्रदर्शित होऊन ३० दिवस झाले आहेत. सॅल्कनिकनुसार, सिनेमाने ३० व्या दिवशी ‘हनुमान अंश’ने १६.२५ कोटींची कमाई केली आहे. ३० दिवशी देशभरात सिनेमाचे ६,०५५ शो दाखवले गेले. या कमाईसह सिनेमाची एकूण कमाई ११७.२७ कोटी इतकी झाली आहे; तर सिनेमाची निव्वळ कमाई ९९.१३ कोटी इतकी आहे.
पहिल्या आठवड्यात सिनेमाने १.०८ कोटींची निव्वळ कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने ०.४० कोटीची निव्वळ कमाई केली, तिसऱ्या आठवड्यात १०.४० कोटी, चौथ्या आठवड्यात सिनेमाने निव्वळ ६१ कोटींची कमाई केली. २९ व्या दिवशी १० कोटी, ३० व्या दिवशी ‘हनुमान अंश’ने १६.२५ कोटींची निव्वळ कमाई केली. त्यांसह सिनेमाने एकूण ९९.१३ कोटींची निव्वळ कमाई केली आहे. कमाईच्या आकड्यांनुसार, सिनेमाला सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला नसल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, तिसऱ्या आठवड्यापासून सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या सिनेमात कोणत्याही मोठ्या कलाकाराचा समावेश नाही. तरीही सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
हनुमान अंश या सिनेमाबद्दल बोलायचे तर सिनेमाचे दिग्दर्शन डॉक्टर विशाल चतुर्वेदी यांनी केले आहे. ७ ऑगस्ट २०२६ रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. नीम करोली बाबा यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे बजेट १.७५ ते २ कोटी इतके आहे. सिनेमाला ओह माय डॉग, आर्यभट्ट का झिरो, आवारापन २, बटवारा १९४७ या सिनेमांशी स्पर्धा करावी लागली. आता हा सिनेमा टॉक्सिक व मिर्झापूर या सिनेमांशी बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करत आहे.
दरम्यान, आता आगामी काळात हा सिनेमा आणखी किती कमाई करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
