अभिनेत्री अमीषा पटेल लवकरच 'गदर २' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱाच काळ चित्रपटांपासून दूर असलेली अमीषा पुनरागमन करणार आहे. आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या अमीषाने हृतिक रोशनबरोबर 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज अमीषाच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त तिचं करिअर व अफेयरबद्दलचे काही खास किस्से जाणून घेऊयात. हेही वाचा - सुंबूल तौकीर खानचे वडील करणार दुसरं लग्न; होणाऱ्या आईबाबत अभिनेत्रीनेच दिली माहिती, म्हणाली… सर्वात आधी अमीषाचं नाव विक्रम भट्टशी जोडलं गेलं होतं. दोघांच्या अफेयरची खूप चर्चा झाली होती. 'आप मुझे अच्छे लगने लगे हैं' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही जवळ आले होते. विक्रम आधीच विवाहित होता आणि तो तिच्यापेक्षा आठ वर्षांनी मोठा होता. काही मीडिया रिपोर्ट्सच्या मते, या अफेयरमुळेच अमीषाचं करिअर उद्ध्वस्त झालं. कारण तिच्या कुटुंबीयांचा त्यांच्या नात्याला विरोध होता. त्यांच्या विरोधानंतर अमीषाने पालकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता व १२ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती. हेही वाचा - हेही वाचा – “मी रात्रभर…” कॅमेऱ्यांसमोर प्रसिद्ध अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड असं काही म्हणाला की नेटकरी संतापले; म्हणाले… अमीषाच्या तक्रारीनंतर प्रकरण चांगलंच गाजलं. तिच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम झाला आणि तिचे नंतरचे तीन चित्रपट फ्लॉप झाले. यामध्ये 'आप मुझे अच्छे लगने लगे', 'क्या येही प्यार है' आणि 'क्रांती' या चित्रपटांचा समावेश होता. विक्रमशी ब्रेकअपनंतर तिचं नाव लंडनमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाशी जोडलं गेलं. त्याचं नाव कनव पुरी होतं. दोघांनी २००८ मध्ये एकमेकांना डेट केलं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही व ते वेगळे झाले. https://www.instagram.com/p/CqQW6_bouxR/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== अमीषाने प्रसिद्ध उद्योगपती नेस वाडियाला डेट केल्याचंही म्हटलं जातं. दोघांना लग्नही करायचं होतं, पण अमीषाने लग्नाऐवजी करिअर निवडलं आणि त्यांचं ब्रेकअप झालं. याशिवाय 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार रणबीर कपूर व अमीषाच्या डेटिंगच्या चर्चाही खूप झाल्या होत्या. पण, या दोघांनीही कधीच त्याबद्दल भाष्य केलं नाही.