बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्री डिंपल कपाडिया यांचा आज ६६ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. त्यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी मुंबईमध्ये झाला होता. डिंपल यांना लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं आणि ते पूर्णही केलं. त्यांनी १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. निर्माता राज कपूर यांचा ‘बॉबी’ (१९७३) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. विशेष म्हणजे त्याच वर्षी त्यांनी स्वतःपेक्षा १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीला अलविदा म्हटलं. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त डिंपल व राजेश खन्ना यांची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. हेही वाचा - “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन डिंपल कपाडिया बॉलिवूडमध्ये येण्याआधीच त्यांची व राजेश खन्ना यांची पहिली भेट झाली होती. दोघेही अहमदाबादच्या एका स्पोर्ट्स क्लबमध्ये पहिल्यांदा भेटले होते. हिमांशू भाई व्यास यांनी दिलेल्या माहितीनुसार ७० च्या दशकात राजेश खन्ना नवरंगपुरा स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. त्यावेळी राजेश यांना डिंपल आवडल्या होत्या आणि तिथेच दोघांची प्रेम कहाणी सुरू झाली. हेही वाचा - कतरिना कैफला आवडतो सासूबाईंनी बनवलेला ‘हा’ पदार्थ; विकी कौशलने केला खुलासा राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांनी १९७३ साली लग्न केलं होतं. डिंपल अवघ्या १६ वर्षांच्या होत्या, तर राजेश खन्ना त्यांच्यापेक्षा तब्बल १५ वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर डिंपल यांनी ब्रेक घेतला व त्या ११ वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्या. दरम्यानच्या काळात त्यांनी ट्विंकल आणि रिंकी या दोन मुलींना जन्म दिला. खरं तर डिंपल यांना चित्रपटात काम करायचं होतं, मात्र राजेश खन्नांचा याला विरोध होता. कालांतराने याच कारणावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले आणि लग्नानंतर ९ वर्षांनी दोघं वेगळे राहू लागले. डिंपल कपाडिया राजेश खन्ना यांना सोडून आपल्या वडिलांच्या घरी राहू लागल्या. पतीपासून वेगळ्या झाल्यावर डिंपल यांनी २ वर्षांनी ‘सागर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. हेही वाचा – दुसऱ्या लग्नाचा निर्णय सांगितल्यावर पहिली पत्नी व २२ वर्षांच्या मुलाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, आशिष विद्यार्थींचा खुलासा नंतरच्या काळात चित्रपटांमध्ये पुन्हा सक्रिय झालेल्या डिंपल कपाडिया यांची अभिनेता सनी देओलशी जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दोघंही जवळपास ११ वर्षं एकमेकांबरोबर होते, असं म्हटलं जातं. डिंपल व सनी दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं होतं, पण दोघेही विवाहित होते. सनी त्याच्या पत्नीला घटस्फोट देऊन डिंपल यांच्याशी लग्न करायला तयार नव्हता. त्यामुळे तब्बल २७ वर्षे राजेश खन्ना यांच्यापासून वेगळं राहूनही डिंपल यांनी त्यांना घटस्फोट दिला नाही असं म्हटलं जातं. राजेश खन्नांच्या निधनाआधी डिंपल त्यांच्यासोबत होत्या. पण लग्नाच्या ९ वर्षांनी त्या वेगळ्या झाल्या ते तब्बल २७ वर्षे त्यांच्यापासून दूर राहिल्या होत्या.