scorecardresearch

सुपरहिट चित्रपटातून पदार्पण, आईबरोबर अफेअरची अफवा अन् घटस्फोट! ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचा हिरो ते झिरो प्रवास

सुपरहिट चित्रपट देणाऱ्या राहुलवर एक वेळ अशी आली होती की त्याला कोणीही मोठे चित्रपट ऑफर करत नव्हते.

rahul-roy-1
(फोटो – संग्रहित)

‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपले नाव कमावणारा अभिनेता राहुल रॉयचा आज ९ फेब्रुवारी रोजी ५५ वा वाढदिवस आहे. राहुलचा जन्म १९६८ मध्ये मुंबईत झाला होता. राहुलने महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आणि राहुल रॉय रातोरात सुपरस्टार बनला. या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या ओठांवर आहेत.

सुपरहिट चित्रपट देणाऱ्या राहुलवर एक वेळ अशी आली होती की त्याला कोणीही मोठे चित्रपट ऑफर करत नव्हते. पण नंतर त्याचे नशीब बदलले आणि त्याला एकाच वेळी ६० चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या. त्याने सर्व चित्रपट साइन केले, पण त्यापैकी तब्बल २५ चित्रपट फ्लॉप झाले होते. राहुल रॉय त्याच्या फिल्मी करिअरसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत राहिला. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या प्रेमप्रकरणांबद्दल जाणून घेऊयात.

“तू ज्या वेदनेत…” आदिल खानची कोठडीत रवानगी होताच राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य

आईबरोबर अफेअरची अफवा

राहुल रॉयने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, एकदा तो आपल्या मित्रांबरोबर पार्टी करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. त्याची आईही तिच्या मैत्रिणींबरोबर तिथे पोहोचली होती. मायलेकांनी एकत्र डान्स केला आणि दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रात बातमी आली की राहुल एका वयस्कर महिलेबरोबर रिलेशनशिपमध्ये होता आणि तो तिच्याबरोबर डान्स करताना दिसत होता. यावर नाराजी व्यक्त करत राहुल म्हणाला होता की, लोकांनी किमान ती महिला कोण आहे याची खात्री करायला हवी होती.

राहुल रॉयची लव्ह लाइफ

एकेकाळी राहुल रॉयचे अफेअर खूप चर्चेत होते. राहुलचे तीन अफेअर होते आणि त्याचा एकदा घटस्फोट झाला. राहुल रॉयचे अफेअर बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टबरोबर होते. दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले. या चित्रपटांच्या माध्यमातून दोघेही एकमेकांच्या खूप जवळ आले होते पण काही कारणांमुळे दोघे वेगळे झाले होते.

अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा, म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईराला देखील ‘मजधार’ आणि ‘अचानक’ या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यान राहुल रॉयच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर सुमन रंगनाथनही राहुल रॉयबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. यानंतर १९९८ मध्ये राहुल रॉय राजलक्ष्मी खानविलकरला भेटला, दोघांनी २००० साली लग्न केलं. पण १४ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला होता. त्यानंतर २०१६ मध्ये राहुलची भेट साधना सिंहशी झाली होती.

राहुलच्या चित्रपटातील करिअरलाही नंतर ब्रेक लागला आणि हळूहळू तो चित्रपटांपासून दुरावत गेला.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 10:33 IST
ताज्या बातम्या