विवाहित दिग्दर्शकावर जडलं होतं प्रेम, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पत्नीने उर्मिला मातोंडकरच्या कानाखाली मारली अन्... | happy birthday urmila matondkar actress releationship with director ram gopal varma during rangeela movie see details | Loksatta

विवाहित दिग्दर्शकावर जडलं होतं प्रेम, दोघांना एकत्र पाहिल्यानंतर पत्नीने उर्मिला मातोंडकरच्या कानाखाली मारली अन्…

उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस, याचबाबत तिच्या खासगी आयुष्यामधील एक प्रसंग आपण जाणून घेणार आहोत

actress urmila matondkar urmila matondkar birthday
उर्मिला मातोंडकर हिचा आज वाढदिवस, याचबाबत तिच्या खासगी आयुष्यामधील एक प्रसंग आपण जाणून घेणार आहोत

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या कलाक्षेत्रापासून दूर आहे. पण तिने आजवर बॉलिवूडला बरेच सुपरहिट चित्रपट दिले. ९०च्या दशकामधील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीमध्ये उर्मिलाचं नावही आवर्जुन घेतलं जातं. आज तिचा ४९वा वाढदिवस आहे. उर्मिला तिचा हा वाढदिवस सध्या सेलिब्रेट करत आहे. आपल्या कामामुळे सतत चर्चेत राहिलेली ही अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरली. याचबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

आणखी वाचा – सिगारेट व दारू पिण्याबाबत रितेश देशमुखने केलं होतं भाष्य, म्हणाला, “जिनिलीया व मी…”

…अन् तिने उर्मिला मातोंडकरच्या कानाखाली मारली

उर्मिलाच्या सौंदर्याचे लाखो दिवाने आहेत. अभिनयक्षेत्रामध्ये काम करत असताना तिचं काही अभिनेत्यांशी नाव जोडलं गेलं. यामध्ये एका सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाचाही समावेश होता. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा व उर्मिलाच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या. ‘रंगीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन राम गोपाल वर्मा यांनी केलं होतं.

याच चित्रपटादरम्यान उर्मिला व राम गोपाल वर्मा यांच्यामध्ये जवळीक वाढली. पण तेव्हा राम गोपाल वर्मा यांचं आधीच लग्न झालं होतं. म्हणूनच दोघांनीही कधीच आपल्या नात्याचा उघडपणे स्वीकार केला नाही. पण या दोघांच्या नात्याचा परिणाम राम गोपाल वर्मा यांच्या वैवाहिक आयुष्यावर होत होता.

आणखी वाचा – देशमुखांची सून झाल्यानंतर पिठलं-भाकरी आवडीने खाते जिनिलीया, पण स्वतः जेवण बनवताना तेलाचा वापरच करत नाही कारण…

‘रिपब्लिकवर्ल्ड डॉट कॉम’च्या वृत्तानुसार राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीला जेव्हा त्यांच्या नात्याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्या अधिक अस्वस्थ झाल्या होत्या. इतकंच नव्हे तर सेटवर दोघांना एकत्र पाहिल्यानंतर राम गोपाल वर्मा यांच्या पत्नीने उर्मिलाच्या कानाखाली मारली होती. राम गोपाल वर्मा यांनी मुंबईमधील त्यांच्या ऑफिसमध्ये उर्मिलासाठी खास रुम तयार केली होती. त्या रुममध्ये एका भिंतीवर फक्त उर्मिलाचेच फोटो होतो. नव्वदच्या दशकामध्ये या दोघांच्या अफेअरच्या चर्चा सगळीकडे वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 11:30 IST
Next Story
“सिनेसृष्टीत क्वचितच…” सिद्धार्थ-कियाराच्या विवाह सोहळ्यापूर्वी कंगना रणौतची खास पोस्ट