Hardik Pandya Mahieka Sharma met Amitabh Bachchan Video: रिलायन्स फाउंडेशनने सोमवारी United in Triumph या कार्यक्रमाचं मुंबईत आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला हार्दिक पंड्या त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्माबरोबर पोहोचला. हार्दिक व माहिका काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग करून पोहोचले होते. दोघांनी महानायक अमिताभ बच्चन यांची भेटही घेतली. त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात आयोजन भारतीय पुरुष व महिला क्रिकेट संघाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खेळाडू, सेलिब्रिटी आणि इतर अनेक जण उपस्थित होते. या कार्यक्रमात हार्दिक आणि महिका एकमेकांचे हात पकडून रेड कार्पेटवर पोहोचले. दोघांच्या एंट्रीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. हार्दिक पंड्या सूटमध्ये खूपच छान दिसत होता आणि माहिका काळ्या शॉर्ट ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. दोघांनी एकत्र पोज दिल्या. त्यांची केमिस्ट्री आणि स्टायलिश लूकची सोशल मीडियावर चर्चा आहे.

अमिताभ बच्चन यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. बिग बी तिथे उपस्थित खेळाडू व स्टार्सना भेटत होते. यावेळी हार्दिक पंड्याने त्याची गर्लफ्रेंड माहिकाची बिग बींशी ओळख करून दिली. अमिताभ बच्चन यांनी आधी हार्दिकला मिठी मारली. नंतर, ते माहिकाला भेटले. बिग बींनी हार्दिककडे बोट दाखवले आणि माहिकाला काहीतरी म्हटलं. अमिताभ बच्चन माहिकाशी बोलले, हे पाहून हार्दिकच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. हार्दिक हसत हसत बिग बींकडे पाहत राहिला. माहिका देखील अमिताभ बच्चन यांना भेटून खूप आनंदी दिसत होती.

पाहा व्हिडीओ

अमिताभ बच्चन यांचा माहिका शर्मा व हार्दिक पंड्याबरोबरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक जण हार्दिक व माहिकाच्या जोडीचं कौतुक करत आहेत. तर काहींनी माहिका हार्दिकला शोभत नसल्याचं म्हणत ट्रोलही केलं आहे.

घटस्फोटानंतर वर्षभराने हार्दिक पंड्याच्या आयुष्यात आली माहिका शर्मा

हार्दिक पंड्याने करोना काळात २०२० मध्ये नताशा स्टॅनकोविकशी लग्न केलं होतं. लग्नानंतर काही महिन्यांनी ते आई-बाबा झाले. त्यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. सगळं आलबेल असताना अचानक हार्दिक व नताशाचं बिनसलंय अशा चर्चा होऊ लागल्या. अखेर २०२४ मध्ये हार्दिक आणि नताशाने सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं. घटस्फोटानंतर हार्दिकचे नाव मॉडेल जास्मिन वालियाशी जोडले गेले होते, पण नंतर त्यांच्याही ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर हार्दिकने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी महिकाबरोबरचे फोटो पोस्ट करून नात्याची अधिकृत कबुली दिली.