Himani Shivpuri speaks about Salman Khan and Aishwarya Rai Relationship: बॉलीवूडचे सर्वात चर्चिले गेलेले कपल सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरचे आणि वादाचे किस्से आजही चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण करतात. आता ज्येष्ठ अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी एका मुलाखतीत या दोघांच्या नात्याबद्दल अनेक वैयक्तिक आठवणींना उजाळा दिला आहे. ‘हमारा दिल आपके पास है’ चित्रपटाच्या हैदराबादमधील शूटिंगदरम्यान सलमान खान दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि सकाळी निघून जायचा, असा खुलासा हिमानी शिवपुरी यांनी केला आहे. तसेच फिल्म सिटीमधील एका वादाचा किस्सा सांगत सलमानने ऐश्वर्याबद्दल काय म्हटले होते, हेही त्यांनी उघड केले.
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी हिमानी शिवपुरी यांनी पहिल्यांदा ऐश्वर्याबरोबर ‘आ अब लौट चलें’ मध्ये काम केलं होतं, त्यानंतर ‘हमारा दिल आपके पास है’ आणि ‘उमराव जान’ मध्ये स्क्रीन शेअर केली होती. ‘हमारा दिल आपके पास है’ च्या शूटिंगच्या दिवसांच्या आठवणी त्यांनी रेड एफएम पॉडकास्टशी बोलताना सांगितल्या. “आम्ही हैदराबादमध्ये शूटिंग करायचो. तेव्हा सलमान खानही खूप जास्त काम करत होता. तो दररोज रात्री ऐश्वर्याला भेटायला यायचा आणि सकाळी निघून जायचा,” असं हिमानी यांनी सांगितलं.
ऐश्वर्याबद्दल हिमानी शिवपुरी म्हणाल्या, “ती खूप छान होती. ती खूप वाचायची आणि आम्ही खूप गप्पा मारायचो. ती फक्त सुंदरच नाही, तर व्यक्ती म्हणूनही ती खूप चांगली आहे असं मला वाटतं.”
त्यांच्या नात्यातील समस्या त्यांनाच ठाऊक – हिमानी शिवपुरी
सलमान आणि ऐश्वर्या यांच्या ब्रेकअपबद्दल विचारलं असता त्यांनी फार बोलणं टाळलं. “त्यांचं नातं यशस्वी झालं नाही. त्यांच्यात काय समस्या होत्या हे त्यांनाच जास्त चांगलं ठाऊक असेल,” असं त्या म्हणाल्या.

हिमानी यांनी एक किस्सा सांगितला. “मला आठवतंय की एकदा आम्ही फिल्म सिटीमध्ये शूटिंग करत होतो. ऐश्वर्या अभिषेकबरोबर रोहन सिप्पीच्या चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि सलमान आला होता. तो मला म्हणाला होता, ‘हिला समजावून सांगा. तिला वाटतं की ती खूप सुंदर आहे. तिला वहीदा रहमान यांच्याकडे पाहायला सांगा.’ मी त्याला शांत राहायला सांगायचे,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या.
सलमान खानबद्दल हिमानी शिवपुरी म्हणाल्या…
बॉलीवूड हंगामाशी बोलताना हिमानी यांनी सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला होता. “सलमान खानबरोबर काम करणं हा खूप चांगला अनुभव होता. तो त्याच्या घरून जेवण आणायचा. बिर्याणी आणि इतर पदार्थ आणायचा. ‘हम आपके हैं कौन’च्या सेटवर फक्त शाकाहारी जेवणच असायचे, म्हणून, तो ईदला बिर्याणी आणायचा आणि आम्ही सर्वजण ती खायचो. तो खूप मस्करी करायचा,” असं हिमानी शिवपुरी म्हणाल्या होत्या.
