आजकाल चित्रपटांमध्ये काल्पनिक गोष्टींपेक्षा सत्यकथांवर आधारित चित्रपट जास्त चालतात. प्रेक्षकांना गूढपट, सत्यघटनेवर आधारित चित्रपट बघण्यात जास्त रस आहे. नुकताच एका अविश्वसनीय सत्यकथेवर आधारित असलेला ‘ऐ जिंदगी’ चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर सोशल मीडियावर सध्या कमालीच ट्रेंडिंग होत आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारा आहे. यात विविध भाषेतील कलाकार काम करत आहेत. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती, मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, सत्यजित दुबे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाची कथा एका २६ वर्षीय यकृत सिरोसिस रुग्ण विनय चावलाचा प्रवास दाखवणारी आहे. त्याची जीवनावरील आशा विश्वास पुन्हा जागृत करण्याचे काम रेवती यांनी साकारलेले पात्र करते. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ.अनिर्बन बोस यांनी केलं आहे ज्यांनी ‘बॉम्बे रेन्स’, ‘बॉम्बे गर्ल्स’, ‘माईस इन मेन’ आणि ‘द डेथ ऑफ मिताली दत्तो’ या कादंबऱ्या लिहल्या आहेत. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले, ‘ऐ जिंदगी’ आणि मी सामान्यपणे करत असलेल्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. मी एक डॉक्टर असल्यानं रूग्णांची काळजी घेतो, तसंच मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. मला माझ्या कम्फर्ट झोनबाहेर काढून, आयुष्यातील दोन वर्षे या चित्रपट निर्मितीकरिता समर्पित करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या कथेतील सौंदर्य प्रेक्षकांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही’.

“जर पात्र श्रीलंकेचे असेल तर ते मुघलांसारखे… ” रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

या चित्रपटातील मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी गोडबोले म्हणाली ‘ऐ जिंदगी’ ही आशा, प्रेम आणि उभारीची कथा आहे. यात खूप आपलेपणाचे वातावरण असल्याने प्रेक्षक प्रत्येक कॅरेक्टरशी स्वत:ला रिलेट करतील. या चित्रपटात मी एका मल्याळम नर्सची भूमिका साकारली आहे, जी माझ्यासाठी नवीन आणि आव्हानात्मक होती’.

ऐ जिंदगी’ हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत आणि उत्तर अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. प्लॅटून वन फिल्म्सने या संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी संस्थेने ‘पिकासो’ आणि ‘युअर्स ट्रुली’ सारख्या प्रशंसनीय चित्रपटांची निर्मिती केली होती. शिलादित्य बोरा हे या संस्थेचे संस्थापक आहेत. ज्येष्ठ गुजराती अभिनेते हेमंत खेर, श्रीकांत वर्मा, सावन टँक, मुस्कान अग्रवाल आणि प्रांजल त्रिवेदी हे कलाकारदेखील चित्रपटात दिसणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindi film ae zindgi film trailer launched revathi mrunmayee godbole in lead role spg
First published on: 06-10-2022 at 15:50 IST