Hindusthani bhau asked audience to boycott goodbye film rnv 99 | हिंदुस्तानी भाऊने केले 'गुडबाय' चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन, जाणून घ्या कारण | Loksatta

हिंदुस्तानी भाऊचे ‘गुडबाय’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन, ‘या’ कारणामुळे व्यक्त केला संताप

उद्या म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हिंदुस्तानी भाऊचे ‘गुडबाय’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन, ‘या’ कारणामुळे व्यक्त केला संताप

अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘गुडबाय’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची खूप चर्चा होती. रश्मिका आणि अमिताभ बच्चन पाहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याने त्यांचे चाहते खूप खुश होते. रश्मिका आणि बिग बीही गेले काही दिवस या कौटुंबिक चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. परंतु आता या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी हिंदुस्तानी भाऊने केली आहे.

आणखी वाचा : Video: ‘आदिपुरुष’ला मिळणाऱ्या प्रतिक्रियांमुळे प्रभास दिग्दर्शक ओम राऊतवर चिडला?, व्हिडिओ व्हायरल

‘गुडबाय’ या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये एकता कपूरचा सहभाग आहे. मात्र गेले काही दिवस ती वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. एकता कपूरच्या वेब सीरिज ‘थ्री एक्स’च्या दुसऱ्या सीझनमध्ये अनेक आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली होती. त्यामध्ये सैनिकांच्या पत्नींशी संबंधित आक्षेपार्ह दृश्यही होते. वेब सीरिजमधील एका दृश्यात, जेव्हा भारतीय जवान ड्युटीवर असतो, तेव्हा त्याची पत्नी लष्करी गणवेश घालून मित्रांबरोबर आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आली होती. याप्रकरणी गेल्या वर्षी एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरुद्ध बिहारच्या बेगुसरायमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यामुळेच हिंदुस्तानी भाऊने या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे प्रेक्षकांना आवाहन केले आहे. नुकतेच त्याने इन्स्टाग्रामवर एक लाईव्ह सेशन केले, त्यात त्याने एकता कपूरबद्दलची मतं मांडत तिला खडे बोल सुनावले. तो म्हणाला, “आजपासून दोन वर्षांपूर्वी एक था कबुतर, अल्ट बालाजीने ‘ट्रिपल एक्स’ ही सिरिज बनवली होती. यामध्ये भारतीय सेनेची, गणवेशाची आणि कुटुंबाची बदनामी झाली. मी याविरुद्ध आवाज उठवला आणि एकताला माफी मागायला सांगितली होती. तिने मला पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासाठी पैसा हा भारतीय लष्करापेक्षा मोठा नाही. आता तिचा ‘गुडबाय’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यामुळे अशा निर्मातीच्या चित्रपटावर आपण बहिष्कार घातला पाहिजे.”

यापूर्वी ‘लाल सिंग चड्ढा’, ‘रक्षा बंधन’, ‘दोबारा’ अशा अनेक चित्रपटांना बॉयकॉटचा सामना करावा लागला आहे. ‘ब्रह्मास्त्र’ सोडल्यास गेल्या काही दिवसात प्रदर्शित झालेला एकही बॉलिवूड चित्रपट चांगली कमाई करू शकलेला नाही. आता त्या यादीत ‘गुडबाय’चा समावेश होतोय का, हे येत्या काही दिवसातच समजेल.

हेही वाचा : “माझा अजूनही विश्वास बसत नाही की…”, रश्मिका मंदानाची अमिताभ बच्चन यांच्यासाठी स्पेशल नोट

विकास बहल दिग्दर्शित ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना यांच्याशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पावेल गुलाटी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. उद्या म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“जर पात्र श्रीलंकेचे असेल तर ते मुघलांसारखे… ” रामायणात सीतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

‘दृश्यम’मधील गायतोंडेला धमक्यांचे, शिवीगाळ करणारे फोन कॉल्स; कमलेश सावंत यांनी सांगितला अनुभव
१७ व्या वर्षी लग्न, अंडरवर्ल्ड डॉनशी संबंध; तब्बल ३० वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतणार प्रसिद्ध अभिनेत्री
“मला प्रीमियरला…” ‘दृश्यम २’ चित्रपटातील मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली खंत
अक्षय, टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी; पोस्टर आले समोर
“ऑडिशनदरम्यान नकार मिळाल्यानंतर मी…” विकी कौशलचा करिअरबद्दल मोठा खुलासा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबईः विलेपार्ले येथे ७४ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची मुलाकडून हत्या; मृतदेह माथेरानच्या दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
विश्लेषण: उपांत्यपूर्व फेरीतून कोणते संघ करणार आगेकूच? फ्रान्स, अर्जेंटिना, ब्राझील…?
‘केजीएफ’ फेम अभिनेत्याचे निधन, ‘रॉकी’बरोबर साकारलेली महत्त्वाची भूमिका
सीमावाद: “मोदींच्या मध्यस्थीने युक्रेन-रशिया युद्ध थंडावले, मग…”; ‘बोम्मई पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे भुंकतात’ असं म्हणत सेनेचा टोला
IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका! रोहित शर्मासहित तीन खेळाडू शेवटच्या एकदिवसीय सामन्यातून बाहेर