शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. दीपिका पदुकोणने गाण्यात घातलेल्या बिकिनीच्या रंगावर अनेक नेते आणि संघटनांनी आक्षेप घेत हा धर्माचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे अनेकजण “हा चित्रपट आपण पाहणार नाही,” असं सोशल मीडियावर म्हणताना दिसत आहेत. पण तसं असलं तरी या गाण्याला पाठिंबा देणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. सोशल मीडियावर अनेक कलाकार ‘बेशरम रंग’ या गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत. आता या वादात गायक आणि रॅपर हनी सिंगने उडी घेतली आहे.

गाण्याच्या वादावर तो उघडपणे बोलला. अलीकडच्या काळात ज्याप्रकारे चित्रपटांविरोधातील आंदोलने वाढली आहेत, त्यावर हनी सिंग म्हणाला की, “पूर्वी यापेक्षा जास्त स्वातंत्र्य होते.” हनी सिंगने २०१३ मध्ये शाहरुख खानच्याच ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटासाठी ‘लुंगी डान्स’ हे गाणं तयार केलं होतं.

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Bacchu kadu and navneet rana
“मोठे भाऊही म्हणता, माफीही मागता, तुमच्या एवढा लाचार माणूस…”; बच्चू कडूंची रवी राणांवर बोचरी टीका

आणखी वाचा : “सगळं आहे पण तू नाहीस…” शाहरुख खानला ‘पठाण’मध्ये हवा होता ‘हा’ आघाडीचा अभिनेता, व्यक्त केलं दुःख

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हनी सिंग म्हणाला, “पूर्वी खूप स्वातंत्र्य होतं. लोक थोडे कमी शिकलेले असायचे पण तेच जास्त समजूतदार होते. ते बौद्धिकदृष्ट्या हुशार होते आणि या गोष्टी ते मनोरंजन म्हणूनच घेत असत. त्यांनी कधीही काहीही मनावर घेतलं नाही.

पुढे ए आर. रहमान यांचा उल्लेख करत हनी सिंग म्हणाला, “रहमान सरांचे एक गाणं होतं, ‘रुक्मणी रुक्मणी शादी के बार क्या क्या हुआ….’ लोकांनी हे गाण स्वीकारलं. मी ते ऐकतच लहानाचा मोठा झालो. पण जेव्हा मी असं गीत लिहिलं तेव्हा लोकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. आता तर परिस्थिती आणखीच वाईट झाली आहे. लोक खूप संवेदनशील झाले आहेत. हे फक्त मनोरंजन आहे पण त्याकडे मनोरंजन म्हणून ते बघत नाहीत.”

हेही वाचा : ‘पठाण’ चित्रपटात कॅमिओ करण्यासाठी सलमान खानने आकारले ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल आश्चर्यचकित

दरम्यान ‘पठाण’ हा एक अॅक्शन थ्रीलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.