एकेकाळी शालेय विद्यार्थी, कॉलेजवयीन तरुण यांच्या ओठी फक्त त्याचीच गाणी आणि रॅप असायची. कुठल्याही नव्या सिनेमात त्याचे गाणे असणार आणि ते हिट ठरणार, अशी परिस्थिती असताना हा गायक व रॅपर सिनेसृष्टीतून अचानक गायब झाला. हा गायक व रॅपर म्हणजे यो यो हनी सिंग. हनी सिंगचा मध्यंतरीचा काळ खूप वादग्रस्त होता. गेल्या काही वर्षांमध्ये हनी सर्व चुकीच्या कारणांसाठी विशेषत: अमली पदार्थांच्या सेवनामुळे चर्चेत होता. गेल्या वर्षी एका पॉडकास्टमध्ये हनी सिंगने अमली पदार्थांचे व्यसन सोडण्यासाठी पुनर्वसन केंद्रात जाण्याबाबतचा उल्लेख केला होता. आता या गायकाने पुनर्वसन केंद्रात गेल्याचा दावा नाकारला आहे. लल्लनटॉपशी बोलताना हनीने अमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित समस्या आणि याचा त्याच्या कुटुंबावर कसा परिणाम झाला हे सांगितले.

हनी म्हणतो की, त्याच्या पुनर्वसन केंद्रात जाण्याबद्दलच्या अफवा हे त्याने स्वतःबद्दल ऐकलेले सर्वांत मूर्ख दावे आहेत. अमली पदार्थांशी त्याची ओळख कशी झाली असे विचारले असता, हनी सिंग म्हणाला की, काही फार मोठ्या प्रभावशाली लोकांनी त्याला अमली पदार्थांच्या सेवनाकडे ढकलले. “मला या पदार्थांचे इतके वाईट व्यसन होते की, मी नेहमीच नशेत असायचो. बऱ्याच वेळा, मी स्वतःबद्दल आणि माझ्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल अनभिज्ञ होतो,” असं तो म्हणाला.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Ruby Prajapati daughter of auto driver passed neet ug medical exam
स्वप्नपूर्ती! ऑटो ड्रायव्हरची मुलगी होणार डॉक्टर; हलाखीच्या परिस्थितीत NEET-UG परीक्षा उत्तीर्ण, वाचा रुबी प्रजापतीचा प्रेरणादायी प्रवास
womens drum, womens in drum corps,
ढोलपथकातल्या ‘तिची’ दुखरी बाजू…
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
gibbon monkey dance marathi news
विश्लेषण: गिबन माकड जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी चक्क नृत्य करते? काय सांगते नवे संशोधन?
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख

हेही वाचा…जुन्या चित्रपटांचे पुन:प्रदर्शन! अमिताभ बच्चन एव्हरग्रीन ‘शोले’बद्दल म्हणाले, “मोबाइलवर कधीही चित्रपट पाहिला नाही…”

पुढे हनीने हेदेखील सांगितले, “मला असलेल्या माझ्यावर व्यसनांवर मात करण्यासाठी कधीही पुनर्वसन केंद्रात जायची वेळ आली नाही. मी दारू, चरस आणि इतर पदार्थ सोडले होते. मी माझ्या कुटुंबाला मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल माहिती दिली, ज्यावर त्वरित लक्ष देण्याची आणि उपचारांची आवश्यकता होती. तेव्हा चित्रपटसृष्टीत आणि शोमध्ये मला प्रचंड मागणी होती. मी अनेक संस्थांशी करार केले होते. मात्र, त्या काळात मला मानसिक आरोग्यासाठी उपचारांची प्रचंड गरज होती. माझी मागणी असलेले वेळापत्रक आणि मी जगभर शोजसाठी केलेले करार यांमुळे आंतरराष्ट्रीय कायदा संस्थांद्वारे होणाऱ्या संभाव्य कायदेशीर परिणामांबद्दलची माहिती मला कुटुंबाने दिली. तरीही मी माझ्या आरोग्याला प्राधान्य दिले आणि जोपर्यंत मला बरं वाटत नाही तोपर्यंत मी काम करण्यास नकार दिला. मला पूर्ण बरं होण्यास सात वर्षं लागली.”

पुढे हनी त्याच्या अमली पदार्थांच्या सेवनावर त्याची माजी पत्नी शालिनीने कशी प्रतिक्रिया दिली याबद्दलदेखील बोलला. तो म्हणाला, “त्यावेळी आमचे नाते फारसे चांगले नव्हते. मी खूप प्रवास करीत असल्यामुळे आमच्यात अंतर आले होते. आमच्या लग्नाच्या सुरुवातीच्या ९ ते १० महिन्यांत गोष्टी चांगल्या होत्या; पण नंतर यश आणि प्रसिद्धी माझ्या डोक्यात गेली. जेव्हा ते घडले, तेव्हा मी माझ्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले आणि पैसा, प्रसिद्धी, व्यसनाधीनता व स्त्रिया यांमध्ये मी स्वतःला पूर्णपणे गमावले. मी अनेक भयानक गोष्टी केल्या. त्या काळात मी शालिनी आणि कुटुंबाला जवळजवळ विसरलो होतो.

हेही वाचा…“आता मी तुमची आनंदी राहिली नाहीये…”, सार्थक सत्य शोधून काढेल का? ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेत काय घडणार, जाणून घ्या…

“शाहरुख खानबरोबरच्या अमेरिका दौऱ्याहून मी भारतात आलो तेव्हा माझ्यात अतिशय गंभीर आजाराची लक्षणे दिसत होती. मुंबईत असणाऱ्या माझ्या एका रिअॅलिटी शोच्या शूटिंगमध्ये सहभागी होण्याऐवजी मी घरी परतलो”, असे हनी सिंगने स्पष्ट केले. त्या घटनेनंतरच हनी आजारी पडला आणि काही वर्षे चित्रपटसृष्टीपासून दूर राहिला. आता हनी सिंग पुनरागमन करीत असून, तो ‘ग्लोरी’ नावाच्या त्याच्या नवीन संगीत अल्बमचे प्रमोशन करीत आहे. लवकरच हनी सिंगच्या जीवनावर आधारित डॉक्युमेंट्रीही येणार आहे.