Sonakshi Sinha Wedding: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज बॉयफ्रेंड झहीर इक्बालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी झाली असून हळूहळू पाहुणे मंडळी पोहोचत आहेत. सोनाक्षीच्या लग्नानिमित्त शत्रुघ्न सिन्हा यांचा मुंबईतील ‘रामायणा’ बंगल्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. लग्नातील कपड्यांपासून सर्व सामान बंगल्यावर पोहोचलं आहे. सोनाक्षी व झहीरच्या लग्नाला सलमान खान, हुमा कुरेशी, मनीषा कोईराला आणि ‘हीरामंडी’ सीरिजमधील कलाकार पोहोचणार आहेत. अशातच प्रसिद्ध रॅपर, गायक हनी सिंग सोनाक्षीच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचला आहे. त्याचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये तो सोनाक्षीच्या लग्नासाठी खूप उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे.

सोनाक्षी हिंदू असल्यामुळे आणि झहीर मुस्लिम असल्यामुळे दोघं कोणत्या पद्धतीने लग्न करणार? सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारणार अशा अनेक चर्चा रंगल्या होत्या. पण यावर सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रत्नासी यांनी स्पष्ट उत्तर दिलं. ते म्हणाले, “ती धर्मांतर करणार नाही. इथे दोन मनं एकत्र येत आहेत, त्यामुळे यात धर्म हा विषय नाही. माझा मानवतेवर विश्वास आहे. हिंदू धर्मात देवाला भगवान म्हणतात आणि मुस्लीम धर्मीय अल्लाह म्हणतात. पण सरतेशेवटी आपण सर्वजण माणूस आहोत. माझे आशीर्वाद नेहमी झहीर आणि सोनाक्षीच्या पाठीशी आहेत. दोघांचं लग्न नोंदणी पद्धतीने होणार आहे.” त्यामुळे सोनाक्षीचं लग्न पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.

हेही वाचा – Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातचा इन्फ्लुएन्सर नलिनी मुंबईकरांबरोबर ‘अंगारों’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

हनी सिंग सोनाक्षीच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचला असून त्याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये हनी सिंग कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. पण सोनाक्षीच्या लग्नासाठी खूप आनंदी आहे. तो पापाराझींशी संवाद साधताना म्हणतो, “आज मी दारू न पिता नाचणार.” हनी सिंगचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – लोकप्रिय मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचे २६व्या वर्षी निधन, वाढदिवशीच झाला अपघात; मनवा नाईक भावुक पोस्ट करत म्हणाली…

हनी सिंग व सोनाक्षी सिन्हाने ‘देसी कलाकार’ गाण्यात एकत्र काम केलं होतं. दोघांचं हे गाणं सुपरहिट झालं होतं. तेव्हापासून दोघांची खूप चांगली मैत्री आहे. दरम्यान, सोनाक्षी व झहीरचं नोंदणी पद्धतीने लग्न झाल्यानंतर मुंबईत मोठी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली आहे. माहितीनुसार, आज रात्रीच शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये रिसेप्शन पार्टी होणार आहे.