Esha Deol: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची लेक ईशा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. आता ईशा तिने सांगितलेल्या एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्याबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग सांगितला आहे. तिच्या ‘दस’ या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान ही घटना घडली होती.

‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत ईशा देओलने ‘दस’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी एका व्यक्तीने तिच्याशी गैरवर्तन केले होते, असा खुलासा केला होता. त्यावेळी ईशाने त्या व्यक्तीला जोरात कानाखाली मारली होती. चोख सुरक्षा व्यवस्था असूनही हा प्रकार घडला होता, असंही ईशाने नमूद केलं.

“मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून आमच्या घरात…”, बॉलीवूड अभिनेत्याच्या पत्नीचा खुलासा; म्हणाली, “तिचे वडील…”

ईशा म्हणाली, “पुण्यात ‘दस’ या चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान हा प्रसंग घडला होता. तिथे संजय दत्त, सुनील शेट्टी, झायेद खान आणि अभिषेक बच्चन होते. प्रीमियर होतं आणि आम्ही गर्दीतून चालत जात होतो. मी आत शिरले तेव्हा सर्व कलाकार एक एक करून येत होते आणि माझ्या आजूबाजूला अनेक बाउन्सर होते. असं असूनही गर्दीतील एका व्यक्तीने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्यावेळी मला माहीत नाही काय झालं, पण मी त्या माणसाचा हात धरला आणि त्याला गर्दीतून बाहेर नेऊन एक कानाखाली मारली होती.”

ईशा देओल (फोटो – इन्स्टाग्राम)

निक्कीला मारल्याने Bigg Boss Marathi मधून बाहेर पडलेली आर्या अमरावतीला कधी जाणार? तिनेच सांगितली तारीख

ईशाने तिच्याबरोबर घडलेला हा वाईट प्रसंग सांगितला. तसेच ती अशा गोष्टी सहन करू शकत नाही, असंही तिने नमूद केलं. यावेळी तिने इतर महिलांनाही अशा प्रकारच्या कृत्यांकडे दुर्लक्ष न करण्याचे आणि त्याविरोधात बोलण्याचे आवाहन केले.

Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…

दरम्यान, ईशा देओलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास काही महिन्यांपूर्वी तिचा घटस्फोट झाला. तिने २०१२ मध्ये भरत तख्तानीशी लग्न केलं होतं. या जोडप्याला दोन मुली आहेत. या दोघांनी १२ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेतला.