Housefull 5 Box Office Collection Day 2 : बॉलीवूड कलाविश्वात सध्या जबरदस्त स्टारकास्ट असलेल्या ‘हाऊसफुल ५’ सिनेमाची चर्चा चालू आहे. ‘हाऊसफुल’ चित्रपटाच्या फ्रेंचाइजीची सुरुवात २०१० मध्ये झाली होती. आतापर्यंत या सिनेमाचे एकूण चार भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता जवळपास ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या सिनेमाचा पाचवा भाग नुकताच प्रदर्शित झाला आहे.
तरुण मनसुखानी दिग्दर्शित ‘हाऊसफुल ५’ चित्रपट ६ जूनला संपूर्ण जगभरात रिलीज झाला. या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी चित्रपटांच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘हाऊसफुल ५ ए’ व ‘हाऊसफुल ५ बी’ असे दोन क्लायमॅक्स असलेले पर्याय प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहेत. याशिवाय सिनेमात एकूण २० लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र या सिनेमाची चर्चा रंगली आहे.
‘हाऊसफुल ५’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर २४ कोटींचा गल्ला जमावला. त्यामुळे वीकेंडला या सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ होईल असा अंदाज आधीच समीक्षकांनी वर्तवला होता आणि अपेक्षेप्रमाणे ‘हाऊसफुल ५’ने दुसऱ्या दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई केल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे. या सिनेमाचं एकूण कलेक्शन ५४ कोटी एवढं झालं आहे.
आता हा मल्टीस्टारर सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये केव्हा एन्ट्री घेणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार ‘हाऊसफुल ५’ सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच मोठी कमाई केली होती. ‘हाऊसफुल ५ ए’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ५.६७ कोटी कमावले होते. तर, ‘हाऊसफुल ५ बी’ने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ७६ हजार ५४३ तिकिटांच्या विक्रीतून २.३५ कोटी कमावले होते.
दरम्यान, ‘हाऊसफुल ५’ चित्रपटामध्ये अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नर्गिस फाखरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लीव्हर, श्रेयस तळपदे, डिनो शर्मा, डीनो शर्मा, डीनो शर्मा, रणजी शर्मा, नाना पाटेकर, आणि आकाशदीप साबीर असे एकूण २० दमदार कलाकार एकत्र झळकले आहेत.