बॉलीवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत, हे अचानक चमकतात आणि काही काळानंतर हरवून जातात. पण काही कलाकार असेही असतात, जे पडद्यावरून गायब असूनही चर्चेत राहतात. याच यादीतील एक नाव म्हणजे अभिनेता फरदीन खान. सुपरस्टारचा मुलगा म्हणून मोठ्या अपेक्षांसह सिनेसृष्टीत आलेल्या फरदीनच्या करिअरचा आलेख तसा फारसा चढता राहिला नाही.

फरदीन खानने १९९८ मध्ये ‘प्रेम अगन या चित्रपटापासून सुरुवात केली. त्यानंतर तो अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसला. ‘जानशीन’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘लव्ह के लिये कुछ भी करेगा’, ‘फिदा’ यांसारख्या काही हिट चित्रपटांनंतरही फरदीनला ते स्टारडम मिळू शकलं नाही, जे त्याच्या समकालीन कलाकारांना मिळालं. पण मधल्या काळात तो अभिनयापासून दूर राहिला.

बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर त्याला सुरुवात कुठून करावी हे माहित नव्हते. यात भर म्हणजे त्याचं १०२ किलो वजन वाढलं होतं. सायरस ब्रोचा यांच्याशी त्यांच्या यूट्यूबवर साधलेल्या संवादात त्याने याबद्दल सांगितलं. तसंच याकाळात त्याला लागलेल्या दारूच्या व्यसनाबद्दलही सांगितलं.

याबद्दल फरदीन म्हणाला, “माझे वजन १०२ ते १०३ किलो झालं होतं. शरीरात फक्त चरबी दिसू लागले होती. पण मग निरोगी राहण्यासाठी मी स्वतःवर काम करत होता. गेल्या आठवड्यात माझं वजन ७८ किलो झालं. मी जवळपास २५ किलो वजन कमी केलं.”

यानंतर त्याने दारूच्या सवयीबद्दल सांगितलं. याबद्दल तो म्हणाला, “२०२० मध्ये मी दारू सोडली. मला ती सवय सोडण्याची गरज होती. कारण ती माझ्या आयुष्यात व्यत्यय आणत होती. मी वयाच्या खूप लहानपणी दारू पिण्यास सुरुवात केली होती. मी दारूमध्ये आणि स्वतःमध्ये बुडालो होतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, २०२४ मध्ये तो संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमध्ये झळकला. अशातच आता त्याचा नुकताच ‘हाउसफुल ५’ हा बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसंच त्याचा ‘द डेव्हिल’ हा कन्नड चित्रपटही येणार आहे.