Kiara Advani fees for Toxic: लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिचा आगामी सिनेमा ‘टॉक्सिक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात कन्नड सुपरस्टार यश मुख्य भूमिकेत आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ‘टॉक्सिक’मध्ये कियारा ‘नादिया’ हे पात्र साकारताना दिसणार आहे. आता सिनेमातील कलाकारांच्या मानधनाबद्दल चर्चा होताना दिसत आहे. कियाराला या सिनेमासाठी किती मानधन मिळालं आहे, याबद्दल जाणून घेऊ…
कियारा अडवाणीने ‘टॉक्सिक’ सिनेमासाठी किती घेतले मानधन?
‘१२३ तेलगू’च्या एका अहवालानुसार, कियारा अडवाणीला ‘टॉक्सिक’ या चित्रपटासाठी विक्रमी मानधन मिळाले आहे. तिने या प्रोजेक्टसाठी तब्बल १५ कोटी मानधन घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे कियाराच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचे सर्वाधिक मानधन आहे. यासह कियारा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सामील झाली आहे.
सिनेमाच्या निर्मात्यांनी नुकतेच ‘टॉक्सिक’मधील पहिले गाणे प्रदर्शित केले आहे. ‘तबाही’ असे सिनेमाचे नाव आहे. यामध्ये कियारा अडवाणी आणि यश यांच्यातील केमिस्ट्री लक्ष वेधून घेत आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
‘टॉक्सिक’ सिनेमा कधी प्रदर्शित होणार?
‘टॉक्सिक’बद्दल बोलायचे झाल्यास, या चित्रपटात नयनतारा, हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गीतू मोहनदास या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. हा चित्रपट २६ ऑगस्ट २०२६ ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री कोण आहे?
प्रियांका चोप्रा जोनास सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. IMDb नुसार, ती एका चित्रपटासाठी अंदाजे १८ ते ३० कोटी रुपये घेते. दीपिका पादुकोणचे मानधन १५ ते ३० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे म्हटले जाते. कंगना रणौत एका चित्रपटासाठी १५ ते २७ कोटी रुपये घेते. आलिया भट्ट १०ते १२ कोटी आणि करीना कपूर ८ ते १८ कोटी घेते.
दरम्यान, टॉक्सिक सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
