Hrithik Roshan Diet Plan & Fitness Secret : अभिनेता हृतिक रोशन आज १० जानेवारी रोजी त्याचा ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. हृतिक या वयातही, कठोर परिश्रम आणि कडक डाएटमुळे तंदुरुस्त आणि तरुण दिसतो. त्याच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी हृतिकने इन्स्टाग्रामवर त्याच्या डाएटची एक झलक शेअर केली. यात त्याच्या प्लेटमधील पदार्थ दिसत होते. आज हृतिक रोशनच्या वाढदिवशी त्याचे फिटनेसचे सिक्रेट जाणून घेऊयात.

हृतिकने त्याच्या प्लेटचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिलेलं, “नवीन नियम. कमी खा, जास्त प्रेम करा. पण तुमची प्लेट भरलेली दिसायला हवी.” हृतिकच्या या पोस्टने नवीन वर्षात त्याच्या चाहत्यांना फिटनेसची प्रेरणा दिली.

हृतिकच्या प्लेटवरून त्याचा हेल्दी डाएट कसा आहे, ते दिसून येतं. तसेच हृतिकच्या वर्कआउटचे व्हिडीओही चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतात. कडक डाएट, वर्कआउट या सवयी त्याला या वयातही तंदुरुस्त राहण्यास मदत करतात.

Award Banner

दर तीन तासांनी जेवतो हृतिक रोशन

न्यूज १८ च्या वृत्तानुसार, हृतिक इंटरमिटेंट फास्टिंग करत नाही. तर तो दर २.५ ते ३ तासांनी जेवतो आणि रात्री ९ नंतर जेवत नाही. हृतिक विचारपूर्वक त्याचे आवडते पदार्थ खातो. त्याच्या आवडत्या पदार्थांमध्ये तंदुरी चिकन, बार्बेक्यू चिकन, ज्वारीचा पिझ्झा आणि कार्बोहायड्रेट-फ्री बर्गर यांचा समावेश आहे.

हृतिक रोशन काय खात नाही?

हृतिक रोशन त्याच्या डाएटमध्ये काही पदार्थ खाणं टाळतो. त्यात मशरूम, रिफाइंड साखर, बियांचे तेल आणि ग्लूटेन यांचा समावेश आहे. त्याला मूग दाळ, भेंडीची भाजी, ज्वारीची भाकर आणि दही फार आवडतं.

हृतिकच्या डाएटबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

हृतिकच्या डाएटबद्दल द इंडियन एक्सप्रेसने कन्सल्टंट डायटिशियन गरिमा गोयल यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “५० व्या वर्षीही तंदुरुस्त आणि एनर्जेटिक राहू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हृतिकचा डाएट एक उत्तम उदाहरण आहे. त्याचा डाएट शिस्तबद्ध आहे. तो एक्स्ट्रीम डाएट करत नाही. तर त्याला जे आवडतात ते पदार्थ डाएटमध्ये समावेश करून निरोगी आहार घेतो.”