हृतिक रोशन सध्या त्याच्या फिटनेसकडे अधिकाधिक लक्ष देताना दिसत आहे. सोशल मीडियाद्वारे त्याने काही दिवसांपूर्वीच त्याच्या बदलत्या लूकचा फोटो शेअर केला. यामध्ये हृतिकचा फिटनेस पाहायला मिळाला. २०१९मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वॉर’ चित्रपटामध्येही त्याचा डॅशिंग अंदाज पाहून प्रेक्षक हैराण झाले होते. आता याच चित्रपटादरम्यानचा एक किस्सा हृतिकने सांगितला आहे.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Shahrukh Khan Farah Khan Friendship
“मी शाहरुख खानसमोर तासभर रडले होते,” फराह खानने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “मला खूपदा डॉक्टरांनी…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

‘वॉर’च्या चित्रीकरणादरम्यान हृतिकच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. नैराश्याच्या वाटेवर हृतिक होता. बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी तो एकीकडे मेहनत घेत होता तर दुसरीकडे त्याचं मानसिक आरोग्य त्याला साथ देत नव्हतं. फिटनेस ट्रेनर क्रिस गेथिनशी संवाद साधताना हृतिकने याबाबत भाष्य केलं.

तो म्हणाला, “मी मरणार आहे असं मला सतत वाटत होतं. त्यावेळी मी ‘वॉर’ चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. हा चित्रपट करण्यासाठी मी अजिबात तयार नव्हतो. माझ्यासाठी हे एक मोठं आव्हान होतं. सगळं काही मला परफेक्ट हवं होतं. पण त्यासाठी माझ्या मनाचीही तयारी नव्हती.”

आणखी वाचा – शहरातलं घर सोडून महाबळेश्वरमध्ये राहतेय सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री, फोटो शेअर करत सांगितलं कसं जगतेय आयुष्य?

हृतिकची या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अवस्था अगदी बिकट झाली. पण त्याने सगळ्या परिस्थितीवर मात करत ‘वॉर’चं चित्रीकरण पूर्ण केलं. हृतिकच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०० कोटी रुपयांची कमाई केली. त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘वॉर’चाही समावेश झाला.