अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेक इव्हेंट्सचा एकत्र हजेरी लावत असतात. अलीकडच्या एका इव्हेंटमधील दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सबाच्या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
हृतिक व सबाने वेब सीरिज ‘रॉकेट बॉईज २’ च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. सबादेखील या सीरिजमध्ये झळकणार आहे. अशातच स्क्रीनिंमधील हृतिक आणि सबाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींनी तर सबाला कंगनाची ‘स्वस्त कॉपी’ म्हटलं आहे. हा व्हिडीओ ‘विरल भयानी’ने शेअर केला आहे.
कंगना आणि हृतिक रोशन यांची कॉन्ट्रोव्हर्सी जगजाहीर आहे. कंगनाने हृतिकबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता, तर हृतिकने मात्र हे वृत्त फेटाळलं होतं. त्यानंतर त्यांनी एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या होत्या, तसेच माध्यमांसमोरही आरोप-प्रत्यारोप केले होते. अशातच हृतिकची गर्लफ्रेंड मात्र कंगनाची स्वस्तातली कॉपी असल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी अभिनेत्यालाही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे.

‘हिच्यापेक्षा कंगना छान होती’, ‘ही कंगनाची स्वस्त कॉपी आहे’, ‘कंगना २.०’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.