भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनचा घटस्फोट झाला आहे. त्याने व आयेशा मुखर्जीने २०२३ मध्ये घटस्फोट घेतला. ते दोघेही २०२० पासून वेगळे राहत होते आणि त्यानंतर तीन वर्षांनी ते कायदेशीररित्या विभक्त झाले. आयेशा परदेशात राहते, तर शिखर भारतात राहतो. आयेशापासून विभक्त झाल्यावर शिखर एका बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. शिखरने तिच्याबरोबर एका चित्रपटातही काम केलं होतं. शिखर बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीशी प्रेमात आहे, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हुमा कुरेशी व शिखर धवनने एकत्र काम केलं होतं, त्यानंतर हे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. दोघांचे काही फोटोदेखील व्हायरल झाले होते, ज्यात ते एकत्र वेळ घालवताना दिसले होते. काही सोशल मीडिया हँडल्सनी तर या दोघांचे लग्न झाले आहे, असं म्हणत लोकांची दिशाभूलही केली. मात्र हे व्हायरल होणारे फोटो बनावट आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. दोघांनी आजवर कधीच एकमेकांबरोबर फोटो काढले नाहीत.

शिखर धवन व हुमा कुरेशीचे व्हायरल होणारे फोटो
शिखर धवन व हुमा कुरेशीचे व्हायरल होणारे फोटो

नेटफ्लिक्सवर एकाच वेब सीरिजचे ३ सीझन ट्रेंडिंग; वाचा मागील आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० सीरिजची यादी!

शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी कधीही एकत्र फोटो काढले नाहीत आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो हे एआयच्या मदतीने तयार करण्यात आले आहेत. शिखर व हुमा एकमेकांना डेट करत नाहीयेत, तसेच त्यांचं लग्नही झालेलं नाही. व्हायरल फोटो हे लोकांशी दिशाभूल करण्यासाठी एआयच्या मदतीने क्रिएट केलेल आहेत. मागील काही दिवसांपासून बऱ्याच सेलिब्रिटींचे असे फोटो व्हायरल होत आहेत. नुकतेच मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा यांचेही असेच एआय जनरेटेड फोटो व्हायरल होत आहेत. सानिया मिर्झाने शोएब मलिकशी घटस्फोट झाल्यावर क्रिकेटपटू मोहम्मद शमीशी लग्न केल्याच्या अफवा या फोटोंमुळे पसरल्या.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ३१ डिसेंबरला बांधली लग्नगाठ, पारंपरिक पद्धतीने पार पडला सोहळा, पाहा Photos

हुमा व शिखरने एकत्र केलंय काम

दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये हुमा कुरेशी, सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या मुख्य भूमिका असलेला डबल एक्सएल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिखर धवनने कॅमिओ केला होता. शिखरला अभिनयात रस आहे. त्याच्या इन्स्टाग्राम रील्स खूप चर्चेत असतात. अनेक ट्रेडिंग गाण्यांवर तो रील्स बनवत असतो.

हेही वाचा – २८ वर्षीय अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, ‘या’ मालिकेत साकारलेली मुख्य भूमिका; शाही सोहळ्याचे फोटो चर्चेत

दरम्यान, हुमा कुरेशीबद्दल बोलायचे झाल्यास ती अॅक्टिंग कोच रचित सिंगला डेट करत असल्याची चर्चा आहे. हुमा व रचित दोघेही सोनाक्षी सिन्हा व झहीर इक्बाल यांच्या लग्नात एकत्र दिसले होते. हुमा किंवा रचित यांनी अद्याप डेटिंगच्या चर्चांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Huma qureshi shikhar dhawan swimming pool photos viral know truth about dating life hrc