४ नोव्हेंबर रोजी सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी यांचा ‘डबल एक्सएल’ (Double XL) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बॉडी शेमिंग या हास्यास्पद वाटणाऱ्या गंभीर विषयावर हा चित्रपट आधारलेला आहे. झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र हे कलाकार या चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून किक्रेटपटू शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सतराम रमानी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी आणि हुमा यांच्यासह चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहे.

हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा दोघीही बॉलिवूडमधील आघाडींच्या अभिनेत्रींपैकी आहेत. त्या सोशल मीडियावर सुद्धा फार सक्रिय आहेत. या नव्या माध्यमाद्वारे त्या ‘डबल एक्सएल’ चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. नुकताच हुमाने एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने “सोनाची भीती वाटत नाही तिच्या चाहत्यांची भीती वाटते डबल एक्सएलच्या जादुई शोमध्ये तुमचे स्वागत आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

आणखी वाचा – रणदीप हुड्डा ‘मेरी कोम’ फेम अभिनेत्रीच्या प्रेमात, शाहरुख खानशी आहे खास कनेक्शन

यामध्ये हुमा हातामध्ये घालणाऱ्या घडाळ्यासह खेळताना दिसते. ‘दिल चाहता है’ चित्रपटामधल्या आमिर खानच्या एका सीनचे अनुकरन करत ती सोनाक्षीला ‘सोना, तुला जादु पहायची आहे का?’ असे विचारते. तिच्या बालिश चाळ्यांना वैतागलेली सोनाक्षी तोंड वाकडं करत ‘नाही’ असं उत्तर देते. तिची प्रतिक्रिया पाहून हुमा तिच्या कानाखाली मारते आणि दोघी मस्तीमस्तीमध्ये मारामारा करायला लागतात. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल झाला आहे.

आणखी वाचा – वाघा बॉर्डरवर ‘हर हर महादेव’ची गर्जना! सैनिकांबरोबर कलाकारांनी साजरी केली दिवाळी

आपल्या देशात व्यक्ती कसा आहे यापेक्षा तो कसा दिसतो यावर जास्त भर दिला जातो. स्थूलता या विषयावर अनेक विनोद केले जातात. या चित्रपटामध्ये दोन स्थूल महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अधिकच्या वजनामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये किती अडचणी येतात आणि या अडचणींवर त्या दोघी मिळून कशा प्रकारे मात करतात हे पाहण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.