Anil Mehta made last calls to Daughter Malaika Arora : मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल कुलदीप मेहता यांनी बुधवारी (१२ सप्टेंबरला) आत्महत्या केली. मुंबईतील वांद्रे भागातील ज्या घरात राहायचे त्याच घराच्या बाल्कनीतून उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. आत्महत्येसारखं धक्कादायक पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी आपल्या दोन्ही मुलींना अखेरचे फोन केले होते, अशी माहिती आता समोर आली आहे.

अनिल मेहता यांनी आत्महत्येच्या काही वेळेआधी त्यांच्या मुली अभिनेत्री मलायका अरोरा आणि अमृता अरोरा यांना शेवटचे फोन कॉल केले होते. “मी वैतागलोय आणि थकलो आहे,” असं ते मुलींना म्हणाले होते, असे वृत्त सूत्रांच्या हवाल्याने ‘इंडिया टुडे’ने दिले आहे. अनिल मेहता यांनी आत्महत्या केली तेव्हा मलायका व तिची बहीण दोघीही मुंबईत नव्हत्या. मलायका पुण्यात होती आणि दुपारी घरी पोहोचली होती.

हेही वाचा – चौकीदार मदतीसाठी ओरडत होता अन्…; मलायकाच्या आईने सांगितलं सकाळी काय घडलं? घटस्फोटानंतरही एकत्र राहायचे अनिल -जॉयसी

वडिलांच्या आत्महत्येनंतर तिने बुधवारी संध्याकाळी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. “आमचे प्रिय बाबा, अनिल मेहता यांचे निधन झाल्याची माहिती देताना खूप दु:ख होत आहे. ते खूप चांगले आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे सर्वात चांगले मित्र होते. त्यांच्या अचानक जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे आणि या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांना गोपनीयतेची विनंती करतो,” असं मलायकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं.

हेही वाचा – वडिलांच्या आत्महत्येनंतर मलायका अरोराची पहिली पोस्ट; म्हणाली, “आमचे प्रिय बाबा…”

अनिल मेहता यांनी (६५) यांचा बुधवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घराच्या सहाव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना घडली तेव्हा मेहता यांची पत्नी जॉयसी पॉलीकार्प या घरातच होत्या. सकाळी ९ वाजता त्यांना घरात पतीच्या चपला दिसल्या, पण ते तिथे नव्हते त्यामुळे त्यांनी शोधाशोध केली. त्या गॅलरीत गेल्या तेव्हा त्यांना सुरक्षारक्षक मदतीसाठी ओरडताना दिसला. नंतर त्यांना जाणीव झाली की काहीतरी भयंकर घडलंय, असं जॉयसी यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितलं.

हेही वाचा – Video: मलायका अरोराच्या वडिलांच्या निधनाबद्दल मुंबई पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; सुसाईड नोट सापडली का? म्हणाले, “अनिल अरोरा यांचा…”

दरम्यान, आज गुरुवारी (१२ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता सांताक्रूझ येथील हिंदू स्मशानभूमीत अनिल मेहता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.