अभिनेत्री जया बच्चन यांना त्यांच्या रागीट स्वभावामुळे अनेकदा ट्रोल केले जाते. त्या सतत चिडचिड करताना, रागवताना, पापाराझींवर भडकतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच त्यांच्याबरोबर फोटो काढणाऱ्यांवरही ते भडकताना दिसतात. नुकतचं त्यांनी त्यांची नात नव्या नवेली नंदा हिच्या ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या स्वभावाबद्दल आणि प्रसारमाध्यमांवरील प्रतिनिधींबद्दल असलेल्या रागाबद्दल भाष्य केले.

जया बच्चन यांना त्यांची नात नव्याने तुमचे मीडियाबद्दलचे मत काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, मला त्यांचा तिरस्कार आहे. मी अशा लोकांचा तिरस्कार करते जे नेहमी तुमच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि तुमच्याबद्दल विविध गोष्टी छापून ते स्वत:चे पोट भरतात. मला अशी लोक अजिबात आवडत नाहीत. मी त्यांचा प्रचंड तिरस्कार करते. तुम्हाला असं करताना लाज वाटत नाही का? असा प्रश्न मी त्यांना अनेकदा विचारते.
आणखी वाचा : अमिताभ बच्चन यांच्या पायाला दुखापत, केबीसीच्या शूटींगदरम्यान पायाची नस कापली

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
kirit somaiya
“…म्हणून काही तडजोडी केल्या”, किरीट सोमय्यांचं वक्तव्य चर्चेत; म्हणाले, “आता मविआ सरकार असतं तर…”
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

जया बच्चन नेमकं काय म्हणाल्या?

“मलाही अनेकदा याचा त्रास होतो. काही गोष्टींचा मी फार प्रकर्षाने विचार करते. त्या मला जाणवतात. हे आज झालंय असं नाही, मला पहिल्या दिवसांपासून ते जाणवत आहे. जर तुम्ही माझ्या कामाबद्दल बोलत असाल तर मला त्याचा काहीही फरक पडत नाही. मी चांगली अभिनेत्री नाही, मी चित्रपटात चांगली काम केलेली नाही. मी चांगली दिसत नाही. मला या गोष्टींचे वाईट वाटत नाही. पण अनेक लोक या गोष्टी फक्त एक सेकंद बघतात आणि मग पुढे जातात, त्याचे मला वाईट वाटते.

जर लोकांना माझी संतप्त भाषणे युट्यूब, इन्स्टाग्राम आणि ट्वीटरवर पुन्हा पुन्हा शेअर करुन त्यांचे दुकान चालवायचे असेल तर मला त्याबद्दल काहीही फरक पडत नाही. त्यांनी ते करत राहावे. मला अजिबात या गोष्टींची पर्वा नाही.

ते वैयक्तिरित्या माझ्याबद्दल काहीही विचार करु शकतात. माझ्या कामाबद्दल मत देऊ शकतात. मी एक वाईट अभिनेत्री आहे, चांगली राजकारणी नाही, असे देखील ते म्हणू शकतात. पण मग माझ्या वैयक्तिक व्यक्तिरेखेबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. मला फक्त रागवता येते, चिडता येते, संताप व्यक्त करता असे जर तुम्ही बोलत असाल तर तुम्ही माझ्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करत आहात. मी सतत कुठेतरी जात असताना माझे फोटो काढत आहात. मी माणूस नाही का?” असा संतप्त प्रश्न जया बच्चन यांनी पापाराझींना विचारला.

आणखी वाचा : “खरं सांगायचं तर…” छगन भुजबळांनी सांगितले गळ्यात नेहमी मफलर परिधान करण्याचे कारण

दरम्यान जया बच्चन या लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात दिसणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करत आहे. यात आलिया भट्ट, रणवीर सिंग, धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत