जानेवारी २०२५ मध्ये सैफ अली खानवर त्याच्या घरात घुसून एका व्यक्तीने हल्ला केला होता. त्याच्याशी झटापट करताना सैफ अली खान जखमी झाला होता. तसंच त्याने जे वार केले त्यामुळे सैफला शस्त्रक्रियाही करावी लागली होती. चोरी करण्याच्या उद्देशानेच हा हल्लेखोर त्याच्या घरात शिरला होता. यावेळी तैमूरने रिक्षा शोधली होती, करीनाही रिक्षा शोधत होती. त्या रात्री काय घडलं होतं ते आता करीना कपूरने कॉफी विथ करण या करण जोहरच्या शोमध्ये सांगितलं आहे.
करीना कपूरने काय सांगितलं?
करीनाला म्हणाली की आम्हाला हे विचारण्यात आलं की सैफवर हल्ला झाला तर त्याचा तो कसा काय रिक्षाने रूग्णालयात गेला? त्यावर मी त्यांना सांगितलं की सैफला तैमूरने रिक्षातून नेलं. घटना घडली तेव्हा मी नाईट ड्रेसमध्ये होते. मी रस्त्यावर सैरभर पळत रिक्षा शोधत होते. मी रस्त्यावर ओरडत होते की प्लीज थांबा. आम्हाला सैफला हॉस्पिटलला न्यायचं आहे. तेव्हा काय करायचं हे खरंच सुचत नव्हतं. मी रस्त्यावर वेड्यासारखी रस्त्यावर धावत-पळत रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते. नशीब तेव्हा माझा व्हिडीओ कुणी शूट केला नाही.
तैमूर म्हणाला अब्बा आर यू गोईंग टू डाय?
मी लिफ्टमध्ये जेव्हा सैफला पाहिलं तेव्हा तो रक्तबंबाळ झाला होता. मी त्याला म्हटलं सैफ डोन्ट डू धिस. तैमूरही तिथेच होता त्याने लगेच विचारलं अब्बा आर यू गोईंग टू डाय? मी सैफकडे पाहिलं आणि तो डोळ्यांनी मला सांगत होता की प्लीज मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्या रात्री हे घडलं ते मी पहिल्यांदा सांगते आहे असंही करीनाने सांगितलं.
सैफ म्हणाल्या माझ्या मानेवर, पाठीत जखमा होत्या
सैफ पुढे म्हणाला, मला जखमा झाल्या होत्या. मानेवर जखमा होत्या, पाठीत जखमा होत्या. माझ्या पाठीत चाकूचा तुकडा होता, टोकदार काहीतरी आहे हे मला जाणवत होतं. जर तो चांगल्या प्रतिचा सुरा असता तर मी त्या दिवशी मेलो असतो. एक मिमीचा तुकडा सैफच्या शरीरात अडकला होता. थोडक्यात माझा जीव वाचला असं सैफने सांगितलं. तसंच डॉक्टरांनी उत्तर पद्धतीने उपचार केले. त्यामुळे सैफ चालू शकला. माझ्यासाठी ती रात्र भयंकर होती. जेह तर इतका लहान आहे. त्याने मला त्याची खेळण्यातली प्लास्टिकची तलवार दिली आणि म्हणाला पुन्हा असं काही झालं तर ही तलवार वापर अशीही आठवण सैफने या मुलाखतीत सांगितली.
इब्राहिमच्या डोळ्यांत मी अश्रू पाहिले-सैफ अली खान
मला जेव्हा डिस्चार्ज मिळाला तेव्हा मी माझ्या मुलाला म्हणजे इब्राहिमला रडताना पाहिलं. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं होतं. तो खूपच भावनिक झाला होता आणि त्याला संतापही आला होता. त्याला त्या माणसाला पकडून मारायचं वगैरे होतं. अशी एक आठवणही सैफ अली खानने सांगितलं. करीना म्हणाली हल्ला झाल्यानंतर अनेक गोष्टी रचल्या गेल्या आता ते आठवलं की हसू येतं. त्यावर सैफ चटकन म्हणाला आधी तर लोकांना वाटलं असणार की माझ्यावर तूच हल्ला केलास. पण त्यावर करीनानेही सांगितलं की पोलिसांनी हल्लेखोराला पकडलं त्यामुळे लोकांना कळलं आणि त्यांच्या या हास्यास्पद चर्चा बंद झाल्या.
