गोवा येथे पार पडलेल्या इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मध्ये ज्युरी हेड व इस्रायली चित्रपट निर्माते नादव लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर टीका केली. लॅपिड यांनी हा चित्रपट ‘व्हल्गर’ व ‘प्रोपगंडा’ असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार यावर भाष्य करत आहेत.

IFFI मधील इतर ज्युरींनी लॅपिड यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर केलेल्या टीकेवर त्यांचं मत व्यक्त मांडलं आहे. लॅपिड यांनी चित्रपटाबद्दल केलेलं भाष्य हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच कोणीही राजकीय टिप्पणी केली नसल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी

हेही वाचा>> “कश्मीर पंडितांच्या…” IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’चा ‘व्हल्गर’ उल्लेख केल्यानंतर चित्रपटातील अभिनेता संतप्त

इंटरनॅशन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI)मधील ज्युरीपैंकी एक असलेल्या सुदिप्तो यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी द कश्मीर फाइल्सवर ज्युरी हेड लॅपिड यांनी केलेल्या टीकेबाबत भाष्य केलं आहे. “IFFI महोत्सवात ज्युरी हेड नादव लॅपिड यांनी द कश्मीर फाइल्स चित्रपटाबद्दल केलेलं वक्तव्य हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. चित्रपट महोत्सवाच्या अध्यक्षांना दिलेल्या अधिकृत सादरीकरण व पत्रकार परिषदेत चारही ज्युरींपैकी कोणीही त्यांची वैयक्तिक मत दिलेली नाहीत”, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> “निलेश साबळेने माझ्या लेकीचा फोटो…” स्नेहलता वसईकरने ‘बिग बॉस’च्या घरामध्ये सांगितला ‘तो’ प्रसंग

“आम्ही सादर केलेली किंवा मांडलेली मतं हा ज्युरी बोर्डने एकत्रित घेतलेला निर्णय आहे. आम्हाला तंत्रज्ञान, दर्जा व सामाजिक-सांस्कृतिक प्रांसगिकता या तीन मुल्यांच्या आधारे चित्रपटाचे परिक्षण करायचे होते. त्यानुसार आम्ही आमचा निर्णय दिलेला आहे. यात कोणीही राजकीय टिपण्णी केलेली नाही. जर तसं कोणी केलं असेल, तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे”, असंही ते पुढे म्हणाले आहेत.

हेही वाचा>> “मी शेवटपर्यंत पत्नीधर्म निभावला पण…” मानसी नाईकचा वैवाहिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

काय म्हणाले होते ज्युरी हेड नवाद लॅपिड?

गोव्यातील पणजी येथे सुरु असलेल्या कार्यक्रमात इस्त्रायलच्या चित्रपट दिग्दर्शकाने ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर जोरदार टीका केली. “काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित आणि त्रस्त आहोत. हा चित्रपट आम्हाला घाणेरडा तसंच प्रचार करणारा वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेची आहे,” असं ते म्हणाले.