IIFA या मनोरंजनविश्वातील सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू आहे. शनिवारी(२७ मे) दुबईत आयफा अवॉर्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील फोटो व व्हिडीओही सोशल मी़डियावर व्हायरल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफा अवॉर्ड सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान व राखी सावंतनेही हजेरी लावली होती. साराने या सोहळ्यासाठी खास लाल रंगाचा ड्रेस परिधान करत ग्लॅमरस लूक केला होता. तर राखी सावंतने आयफा सोहळ्यासाठी लाल रंगाचा गाऊन घातला होता. याबरोबरच राखीने ड्रेसला मॅचिंग डिझायनर हॅट घालत हटके लूक केला होता.

हेही वाचा>> “आज माझी वेळ आहे, उद्या…”, कुस्तीपटू व पोलिसांमधील झटापटीनंतर विजेंदर सिंगचं ट्वीट, बॉलिवूड अभिनेता म्हणाला, “एकदम…”

राखी व साराचा आयफा सोहळ्यादरम्यानचा एक व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्य राखीचा हटके लूक पाहून सारा खान जोरात ओरडल्याचं दिसत आहे. “तू पण लाल रंगाचा ड्रेस घातला आहेस,” असं सारा राखीला विचारते. यावर राखी तिला “पण, मी तुझ्यापेक्षा सुंदर दिसत आहे,” असं म्हणते. “तुला पाप लगेल,” असं सारा राखीला म्हणताना दिसत आहे. राखी साराला, “मी तुझ्या गाण्यावर डान्स करेन आणि मला पाप लागेल,” असं उत्तर देते.

सारा व राखी या व्हिडीओमध्ये ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटातील “बेबी मुझे पाप लगेगा” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. सारा व राखी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सारा खान ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती विकी कौशलसह मुख्य भूमिकेत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Iifa awards sara ali khan rakhi sawant twinning video goes viral kak
Show comments