scorecardresearch

Premium

ब्रेकअप, कतरिनाच्या भावाशी अफेअर अन् आता लग्नापूर्वीच आई होणार इलियाना डिक्रूझ, चर्चांना उधाण

Ileana D’cruz Announced Pregnancy : कतरिना कैफच्या भावाच्या बाळाची आई होणार इलियाना डिक्रुझ? अभिनेत्रीने प्रेग्नंसी जाहीर केल्यावर चर्चांना उधाण

ileana d'cruz with katrina family
इलियाना डिक्रुझ

‘बर्फी’ फेम अभिनेत्री इलियाना डिक्रुझने ती गर्भवती असल्याचं जाहीर केलंय. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत तिने सर्वांना ती लवकरच आई होणार असल्याची माहिती दिली. इलियाना डिक्रुझचं लग्न झालेलं नाही, त्यामुळे त्या बाळाचे वडील कोण किंवा तिचा बॉयफ्रेंड कोण आहे? याबद्दल नेकटरी प्रश्न विचारत आहेत. अशातच इलियाना कतरिना कैफच्या भावाला डेट करत होती, त्यामुळे बाळाचा पिता तोच असावा, असंही म्हटलं जातंय.

लग्न न करताच इलियाना डिक्रूज होणार आई, गरोदरपणाची घोषणा करत म्हणाली…

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
boy saved in dumas sea
१२ वर्षांच्या मुलाची २६ तास समुद्राशी झुंज; गणेशमूर्ती बसवायच्या लाकडी फळीचा मिळाला आधार!
kitchen tips in marathi how to make roti with tea strainer kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: चपातीवर चहाची गाळणी नक्की फिरवा; अशी कमाल होईल की तुम्ही विचारही केला नसेल, काय ते VIDEO मध्ये पाहा
hunger strike, Rohit Patil, Health deteriorated, sangli
उपोषण सुरु करताच रोहित पाटलांची प्रकृती खालावली

गेल्या वर्षी इलियानाचा कतरिना कैफ व तिच्या कुटुंबाबरोबरचा एक फोटो व्हायरल झाला होता. तेव्हापासून ती कतरिनाचा भाऊ सेबॅस्टियनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘कॉफी विथ करण सीझन ७’मध्ये करणने याबद्दल वक्तव्य केलं होतं, पण इलियानाने जाहीरपणे नात्याची कबुली दिली नाही, तसेच त्याच्याशी लग्नही केलेलं नाही. त्यामुळे इलियानाचा पार्टनर कोण आहे, याबद्दल नेटकऱ्यांना प्रश्न पडू लागले आहेत.

दरम्यान, सेबॅस्टियन आणि इलियाना जवळपास एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहेत, असं म्हटलं जातंय. नवभारत टाइम्सने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दोघे अनेकदा कतरिनाच्या वांद्रे येथील जुन्या घरात एकत्र दिसले. सेबॅस्टियन आणि इलियाना इन्स्टाग्रामवर देखील एकमेकांना फॉलो करतात.

दरम्यान, गेल्या वर्षी जुलै महिन्यात इलियाना कतरिनाच्या जवळच्या मित्रांसोबत दिसली. सर्वजण कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले होते. इलियानाने स्वत: कॅटरिना, विकी कौशल, सेबॅस्टियन, इसाबेल, आनंद तिवारी आणि मिनी माथूर यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट केला होता.

कतरिनाच्या भावाला डेट करण्यापूर्वी इलियाना डिक्रूझ ऑस्ट्रेलियाचा फोटोग्राफर अँड्र्यू नीबोनसोबत रिलेशनशीपमध्ये होती. काही कारणाने त्यांचं ब्रेकअप झालं होतं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ileana dcruz announced pregnancy she was dating katrina kaif brother sebastian laurent michel see photo hrc

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×