आमिर खानच्या भाच्याचा घटस्फोट झाला? अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिकाने शेअर केली पोस्ट, म्हणाली…

काही वर्षांपासून इमरान त्याची पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळा राहत आहे.

imran khan awantika malik
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आमिर खानचा भाचा आणि बॉलिवूड अभिनेता इमरान खानने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. तो बॉलिवूडमधील सर्वात प्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. पण, गेल्या काही वर्षांपासून तो चित्रपटांपासून दूर आहे. तो काही कार्यक्रमांना हजेरी लावत असतो, पण रुपेरी पडद्यावर तो दिसत आहे. आता इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

१३ व्या वर्षी घेतली ४४ लाखांची आलिशान गाडी; अभिनेत्रीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, “या वयात लायसन्स…”

काही वर्षांपासून इमरान त्याची पत्नी अवंतिका मलिकपासून वेगळा राहत आहे. लग्नाच्या आठ वर्षांनी त्यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली होती. पण घटस्फोट घेतला नसल्याचंही सांगितलं होतं. पण आता मात्र त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. अवंतिकाने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यावरून इमरान व तिचा घटस्फोट झाला आहे, असं म्हटलं जातंय.

रजनीकांत यांच्या मुलीचे दागिने चोरीप्रकरणी दोघांना अटक; ऐश्वर्याकडे १८ वर्षे काम करणाऱ्या मोलकरणीने कोट्यवधींचे दागिने विकून…

अवंतिकाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली आहे. लोकप्रिय हॉलीवूड गायिका मायली सायरसचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ तिने स्टोरीला शेअर केलाय. त्यावर ‘घटस्फोट तिच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट होती’ असं लिहिलंय. ही क्लिप शेअर करत “फक्त तिच्यासाठीच नाही…#justsaying,” असं अवंतिकाने लिहिलं आहे. त्यामुळे इमरान व तिचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

अवंतिका मलिकची इन्स्टाग्राम स्टोरी

दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत, पण अद्याप याबद्दल इमरान किंवा अवंतिकाने स्पष्टीकरण दिलं नाही. पण, काही वर्षांपासून वेगळे राहण्याऱ्या इमरान अवंतिकाने घटस्फोट घेतला असू शकतो, अशा चर्चा आहेत. या दोघांनी २०११ मध्ये लग्न केलं होतं व २०१९ पासून ते वेगळे राहत आहेत. त्यांना इमारा मलिक खान नावाची मुलगीही आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 14:04 IST
Next Story
..अन् शाहरुखने भर पार्टीत फराह खानच्या पतीच्या लगावली होती कानशिलात; ‘या’ कारणामुळे झालं होतं भांडण
Exit mobile version