scorecardresearch

प्रसिद्ध अभिनेत्री नगमाला एक लाख रुपयांचा गंडा; मुंबई पोलिसांत नोंदवली तक्रार

अभिनेत्री नगमा यांनी वांद्रे पोलीस चौकीत एफआयआर दाखल केली आहे

nagma
फोटो : इंडियन एक्सप्रेस

मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना गंडा घातल्याचे बरेच किस्से आणि घटना आपल्या कानावर आल्या आहेत. आता पुन्हा एका अभिनेत्रीला चक्क १ लाख रुपयांचा गंडा घालण्यात काही लोकांना यश मिळालं आहे. अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांनी सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नगमा यांच्या बँक खात्यातून सुमारे एक लाख रुपये गायब झाले असल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी त्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४१९, ६६ सी आणि ६६ डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरुवात केली आहे. २८ फेब्रुवारीला नगमा यांच्या मोबाईलवर नेट बँकिंग सुविधा ब्लॉक केली असल्याचा मेसेज आला होता. याबरोबरच रात्री पॅन कार्ड नंबर अपडेट करण्यासाठीदेखील विनंती करण्यात आली होती. यानंतर नगमा यांनी लिंकवर क्लिक केल्यानंतर ओटीपी विचारण्यात आला. मोबाईलमध्ये ओटीपी क्रमांक अपडेट करताच त्यांच्या बँक खात्यातून ९९,९९८ रुपये काढण्यात आले.

आणखी वाचा : “मला सिगारेट ओढणाऱ्या मुली आवडतात कारण…” ज्येष्ठ अभिनेत्री सीमा पाहवा यांचं विधान चर्चेत

याप्रकरणी अभिनेत्री नगमा यांनी वांद्रे पोलीस चौकीत एफआयआर दाखल केली आहे. गेल्या दोन आठवड्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. मुंबई सायबर सेलने अशा प्रकरणांमध्ये ७० हून अधिक तक्रारी नोंदवल्या असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. अशा फसवणुकीसाठी ३०० हून अधिक सिमकार्डचा वापर केला जात असल्याची माहितीदेखील समोर आली आहे.

या फसवणुकीसाठी ५००० हून अधिक सिमकार्डचा वापर होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा एक गंभीत गुन्हा आहे, ज्यामध्ये एका मोठ्या टोळीचा हात आहे. सायबर डीसीपी यांच्याच्या म्हणण्यानुसार “असे मेसेज लाखो लोकांना पाठवले गेले आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. ही टोळी सध्या कुठून कार्यरत आहे आणि त्यात किती लोक आहेत? हे अद्याप कळलेले नाही.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 18:34 IST
ताज्या बातम्या