scorecardresearch

२०२३ हे वर्षं ठरलं बॉलिवूडसाठी लकी; वर्ष अखेरीपर्यंत हिंदी चित्रपट करणार ‘इतक्या’ कोटींची कमाई

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका रीपोर्टनुसार २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपट एवढी कमाई करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे

box-office-report
फोटो : सोशल मीडिया

बॉलिवूड म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टी पुन्हा बॉक्स ऑफिसवर जोर धरू लागल्याचं चित्र गेल्या महिन्यापासून दिसायला लागलं आहे. ‘गदर २’, ‘ओह माय गॉड २’, ‘ड्रीम गर्ल २’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली अन् पाठोपाठ आलेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसचं चित्रच पालटून टाकलं. त्यामुळे हे वर्षं बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं आहे.

एकूणच सध्याचे आकडे पाहता अन् येणारे काही चित्रपट लक्षात घेता यंदा बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपट जवळपास १२००० कोटींचा व्यवसाय करू शकतात अशी चर्चा आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या एका रीपोर्टनुसार २०२३ मध्ये बॉक्स ऑफिसवर भारतीय चित्रपट एवढी कमाई करू शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

आणखी वाचा : Singham Again Mahurat :’सिंघम अगेन’चा शुभारंभ; रणवीर, अजय व रोहितला फ्रेममध्ये पाहून अक्षय कुमार म्हणाला, “मी मनाने…”

कोविडदरम्यानच्या खडतर काळानंतर आता हे दिवस भारतीय चित्रपटसृष्टीला पाहायला मिळत आहेत. २८ जुलैला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने बॉक्स ऑफीसवर १५० कोटींचा गल्ला जमवत ही सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या ‘गदर २’ने बॉक्स ऑफिसवर धिंगाणाच घातला. सनी देओल अनिल शर्मा यांनी मिळून बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला. वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘ओह माय गॉड २’ने १३५ कोटींची कमाई केली अन् आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ने सुद्धा अनपेक्षितपणे १०० कोटींचा आकडा पार केला.

७ सप्टेंबरला आलेल्या किंग खानच्या ‘जवान’ने तर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. जगभरात जवानने ७०० कोटींचा टप्पा पार केला आहे तर भारतात या चित्रपटाने ५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. या बरोबरच पुढचे तीन महीनेसुद्धा बॉक्स ऑफिसवर अशीच भारतीय चित्रपटांची कामगिरी पाहायला मिळू शकते.

अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट, सलमान खान व कतरिना कैफचा बहुचर्चित ‘टायगर ३’, रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ अन् वर्षाच्या शेवटी येणारा शाहरुख खानचा ‘डंकी’ हे चित्रपट यंदा बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करू शकतात. या चित्रपटांबरोबरच आणखी काही दाक्षिणात्य चित्रपटही प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे २०२३ मध्ये भारतीय चित्रपट अन् खासकरून बॉलिवूडचे चित्रपट १२००० कोटींच्या आसपास कमाई करू शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 11:50 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×