Radhika Madan’s luxury home in Mumbai: ‘अंग्रेजी मीडियम’, ‘कच्चे लिंबू’, ‘सरफिरा’, ‘कुत्ते’, ‘शिद्दत’ अशा अनेक चित्रपटांतून तसेच हिंदी मालिकांमधून अभिनेत्री राधिका मदनने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
राधिका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिचे विविध फोटो, व्हिडीओ लक्ष वेधून घेत असतात. काही दिवसांपूर्वी फराह खानने तिच्या घरी गेली होती. त्यावेळी तिच्या घराची खास झलक पाहायला मिळाली.
राधिका मुंबईतील जुहूमध्ये सुंदर आणि प्रशस्त ३ बीएचके अपार्टमेंटमध्ये राहते. तसेच, या घराला सुंदर गार्डनदेखील आहे. हे गार्डन पाहिल्यानंतर फराह खानने तिला प्रश्न विचारला होता की तू इथे पार्टी करतेस की योगा? त्यावर राधिका म्हणते की मी सकाळी योगा करते आणि रात्री पार्टी करते. पुढे फराह खानने विचारले होते की तू इतक्या मोठ्या घरात एकटी राहतेस का? त्यावर अभिनेत्री म्हणाली की हो मी एकटी राहते.

राधिकाचं प्रशस्त घर पाहिल्यानंतर फारहला तिचे कौतुक वाटले. ती म्हणाली की हे दिल्लीतील घरे कशी असतात, तसे हे घर आहे. त्यावर राधिका म्हणाली की मी दिल्लीचीच आहे. तसेच, जेव्हा राधिकाने एक पार्टीशन उघडले, तेव्हा तिथे किचन असल्याचे पाहायला मिळाले. ते पाहून फराह जेम्स बॉण्डचं किचन असल्यासारखे वाटत आहे, असे म्हणाली.
तसेच तिच्या किचनमध्ये मातीचे भांडे पाहायला मिळाले. राधिकाने सांगितले की ती मातीच्या भांड्यातीलच पाणी पिते. राधिकाला फराहने विचारले की एकूण किती बेडरूम आहेत? त्यावर अभिनेत्रीने तीन बेडरूम असल्याचे सांगितले. राधिकाच्या घराचा रंग पांढरा असून तिने विविध वस्तूंनी तिचे घर सजवले आहे.

डायनिंग एरीयामध्ये तिने कपाटात पुस्तके ठेवल्याचे दिसले. तसेच मीटिंगरूममध्ये तिच्या ट्रॉफी पाहायला मिळतात. गार्डनच्या सुरुवातीला वाहते पाणी देखील दिसते. तसेच अमिताभ बच्चन यांनी तिचा अंग्रेजी मीडियम चित्रपटातील काम पाहून तिचे कौतुक करणारे एक पत्र लिहिले होते. ते तिने तिथे ठेवले असल्याचे पाहायला मिळाले.

राधिकाचे सुंदर घर पाहिल्यानंतर फराहला आश्चर्य वाटल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळाले.

फराह खान विविध कलाकारांच्या घरी जाते. त्यामुळे अनेक लोकप्रिय कलाकारांच्या घराची झलक पाहायला मिळते. त्यांचे घर कसे आहे, ते कसे राहतात, त्यांची जीवनशैली कशी आहे, तसेच त्यांनी त्यांचे घऱ कसे सजवले आहे, याची झलक देखील फराह खानच्या य़ुट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
फराह कलाकारांच्या घरी त्यांनी बनवलेले खास पदार्थदेखील दाखवते. ते कसे बनवतात हेही या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. तसेच, या गप्पांदरम्यान एखाद्या शूटिंगचे किस्सेदेखील ऐकायला मिळतात. म्हणून फराह खानच्या युट्यूब व्हिडीओचा मोठा चाहतावर्ग आहे.

