scorecardresearch

सलमान खानला जूही चावलाशी करायचं होतं लग्न; तिच्या वडिलांची भेटही घेतली होती, पण….

एका मुलाखतीत खुद्द सलमानने याबाबत खुलासा केला आहे.

salman-khan-juhi-chawla
सलमानला जूहीबरोबर करायचं होत लग्न (संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याचे चित्रपट, त्याची स्टाइल, त्याचे ट्रेंड, त्याची कामाची पद्धत यामुळे चर्चेत असतोच. त्याहून सलमानच्या कॉंट्रोवर्सी आणि लव्ह लाईफ या दोन गोष्टींची चर्चा आजही प्रचंड होते. वेगवेगळ्या अभिनेत्रींबरोबर सलमानचं नाव जोडलं गेलं, बहुतेक सगळ्याच अभिनेत्रींना त्यांचा जोडीदार सापडला. पण तब्बल ६ अभिनेत्रींना डेट करूनही सगळ्यांचा लाडका भाईजान अजूनही सिंगलच आहे. मात्र, बॉलिवूडमध्ये एक अशी अभिनेत्री आहे जिच्याशी सलमानला लग्न करायचे होते. सलमान लग्नासाठी त्या अभिनेत्रीच्या वडिलांनाही भेटला होता. याबाबत सलमानने स्वत: खुलासा केला आहे. कोण ती अभिनेत्री आणि काय झालं पुढे वाचा सविस्तर

हेही वाचा- ‘तू प्लास्टिक सर्जरी केली आहेस का?’ नेटकऱ्यांच्या प्रश्नावर राजकुमार रावचे स्पष्ट उत्तर, म्हणाला…

ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जूही चावला आहे. सलमानला जूहीशी लग्न करण्याची इच्छा होती. सलमानला जूही खूप गोड वाटायची म्हणून त्याला तिच्याशी लग्न करायचे होते. एवढंच नाही तर सलमान लग्नासाठी जूहीच्या वडिलांनाही जाऊन भेटला होता. मात्र, जूहीच्या वडिलांनी सलमानला नकार दिला. जुहीच्या वडिलांनी त्याला का नाकारले होते? आपल्या मुलीसाठी त्यांना मुलामध्ये कोणते गुण हवे होते हे अद्याप सलमानला समजले नाही.
जूही आणि सलमानने दिवाना मस्ताना या एकाच चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटात सलमान आणि जूहीसह नील कपूर आणि गोविंदाही मुख्य भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात सलमान खानची खास भूमिका होती. हा चित्रपट डेव्हिड धवनने दिग्दर्शित केला होता. जुहीने १९९५ मध्ये बिझनेसमन जय मेहताशी लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत.

हेही वाचा- “ती सगळा राग माझ्यावर…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षय कुमारकडे केली होती ट्विंकल खन्नाची तक्रार

सलमानचे ६ अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होत नाव

आत्तापर्यंत सलमानचे सहा अभिनेंत्रीबरोबर नाव जोडलं गेल्याचं पहायला मिळालं आहे. ज्यामध्ये संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरीना कैफ, झरीन खान, लुलिया वेंतूर यांचा समावेश आहे. मात्र, सलमानने यातील एकाही अभिनेत्रीबरोबर घर बसवले नाही. बहुतेक सगळ्याच अभिनेत्रींना त्यांचा जोडीदार सापडला. पण तब्बल ६ अभिनेत्रींना डेट करूनही सगळ्यांचा लाडका भाईजान अजूनही सिंगलच आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 12:05 IST

संबंधित बातम्या