अभिनेते इरफान खान आज या जगात नाहीत पण चाहत्यांच्या आठवणीत ते आजही जिवंत आहेत. इरफान खान यांचं नाव घेताच बोलक्या डोळ्यांचा चेहरा आठवतो. इरफान खान यांचे डोळे त्यांच्या चित्रपटांमधील संवादांपेक्षा जास्त बोलून जायचे. त्याच्या चेहऱ्यावरील साधेपणा आणि निरागसता यामुळे अनेकजण त्यांचे चाहते होते. पण त्यांची पत्नी सुतापा सिकदर याच कारणाने त्यांच्यावर फिदा होती. आज सुतापा आणि इरफान खान यांच्या लग्नाचा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊयात त्यांची फिल्मी लव्हस्टोरी…

इरफान खान आणि सुतापा सिकदर यांनी २३ फेब्रुवारी १९९५ रोजी लग्न केलं होतं. पण यांच्या लग्नाची कहाणी खूपच रंजक आहे. सुतापा आणि इरफान यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात दिल्लीच्या मंडी हाऊसमधील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून झाली होती. दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि मग ही मैत्री प्रेमात बदलली. रिपोर्टनुसार सुतापा आणि इरफान एका अॅक्टिंग सेशनमध्ये एकमेकांना भेटले होते. त्यावेळी इरफान जयपूरमधून दिल्ली आले होते आणि त्यांनी पाहिलं की इथे मुलीही मैत्रिणी होऊ शकतात. ज्यांच्याशी आपण मनातलं सगळं बोलू शकतो.

Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
kumar pillai establish new gang after controversy with chhota rajan
अधोविश्व : कुमार पिल्लई, छोटा राजनशी वाद आणि नवी टोळी
minor girl kidnapped from chhattisgarh rape by railway head constable
इन्स्टाग्राम मित्राला भेटण्यासाठी अल्पवयीन मुलगी नेपाळहून एकटीच आली; पण प्रियकराने मुंब्र्यात…

आणखी वाचा- ‘तो’ एक कॉल अन् भाग्यश्रीला मिळाला ‘मैंने प्यार किया’, नेमकं काय घडलं?

इरफान आणि सुतापा यांच्यात बऱ्याच गोष्टी समान होत्या. कोणत्याही मुद्द्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन एकसारखा होता. त्यामुळे दोघांमधली मैत्री हळू-हळू प्रेमात बदलू लागली. त्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. बराच काळ दोघंही लिव्ह इन मध्ये राहिले. दोघांनी आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं होतं. पण अशातच सुतापा प्रेग्नंट राहिल्या. त्यामुळे इरफान यांनी एका खोलीच्या घरातून दोन खोल्यांच्या घरात राहायला जाण्याचा निर्णय घेतला. पण असं घर शोधणं कठीण होतं. कारण ते जिथे जातील तिथे लोक त्यांना लग्नाबद्दल विचारत होते. शेवटी सगळ्या प्रश्नांना कंटाळून सुतापा आणि इरफान यांनी २३ फेब्रुवारी १९९५ रोजी कोर्ट मॅरेज केलं.

आणखी वाचा- “तिने माझ्यासाठी सीनमध्ये…”, भूमी पेडणेकरबद्दल रणवीर सिंगचा मोठा खुलासा

एका मुलाखतीत इराफान खान यांनी सांगितलं होतं की सुतापाशी लग्न करण्यासाठी ते धर्म परिवर्तन करण्यासाठीही तयार होते. पण याची गरज पडली नाही. सुतापा यांच्या कुटुंबियांनी इरफान यांना त्यांच्या धर्मासह स्वीकारलं. दोघांमध्ये खूप चांगलं बॉन्डिंग होतं. दोघंही आपल्या वैवाहिक आयुष्यात खूश होते. पण कॅन्सरमुळे २०२० मध्ये इरफान खान यांचं निधन झालं.