Irrfan Khan Wife Sutapa Sikdar Post : इरफान खान बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता होता. त्याने त्याच्या सहज सुंदर अभिनयाने कायम प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तो इंडस्ट्रीतील अशा काही मुरलेल्या कलाकारांपैकी एक होता, ज्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली, त्यामुळेच आज तो हयात नसतानाही प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून तो जिवंत आहेत.
इरफान खानचं निधन कोविडदरम्यान २०२०मध्ये झालं. तो कर्करोगाशी झुंजत होते, परंतु त्याची ही झुंज अपयशी ठरली आणि त्याने जगाचा निरोप घेतला. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. त्याचा मुलगा अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. अशातच इरफानच्या पत्नी लेखिता सुतापा सीकदार यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.
इरफान खान व सुतापा सीकदर यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुतापा यांनी ही पोस्ट शेअर करत इरफान खानची आठवण काढत भावना व्यक्त केल्या आहेत. २३ फेब्रुवारी रोजी इरफान व सुतापा यांचा लग्नाचा वाढदिवस असतो. यानिमित्त सुतापा इरफानच्या गावी गेल्या होत्या आणि त्यांनी तिथे हा खास दिवस साजरा केल्याचं या पोस्टमधून म्हटलं आहे. यावेळी त्यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या काही दिवसांनंतर ही पोस्ट शेअर करत इरफान यांना लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा सुतापा यांच्याबरोबर पारंपरिक पद्धतीने लग्न करायचं होतं याबद्दल सांगितलं आहे.
इरफान खानच्या पत्नीने शेअर केली भावुक पोस्ट
सुतापा या पोस्टमधून म्हणाल्या, “२३ तारखेला आपल्या लग्नाचा वाढदिवस होता आणि लग्नासाठी ही तारीख निवडण्यामगचं कारण म्हणजे तुला माझा वाढदिवसही लक्षात राहावा. इरफानला तारखा लक्षात राहत नाही, त्याला तारीख लक्षात राहावी म्हणून हा निर्णय घेतला होता. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा इरफान. लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुला पुन्हा लग्न करायचं होतं आणि आपण जे आपल्या लग्नावेळी करू शकलो नाही, पण कदाचित नशीबसुद्धा तुझ्या बाजूनेच होतं म्हणून आपल्याला पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न करता आलं नाही.”
सुतापा पुढे म्हणाल्या, “आम्ही सध्या रमझानमध्ये रोजा ठेवत आहोत आणि तेकडे आई तुला रोजा ठेवत जा इरफान असं म्हणत असतील आणि तुला हे समजवावं यासाठी त्यांनी तुला रमझानमध्ये वरती बोलावलं असेल. लग्नाच्या वाढदिवसाच्या आणि रमझानच्या सुभेच्छा. आपल्या लग्नाच्या वाढदिवशी मी तुझ्या गावी टोंकला गेले होते आणि तिथेच हा दिवस साजरा केला. मला तुझ्या हसण्याचा आवाज येत आहे,” असं म्हणत त्यांनी दिवंगत पती इरफानसाठी भावनिक पोस्ट शेअर केली. यावेळी त्यांनी त्यांच्या सासरचा एक फोटोही शेअर केला आहे.
