scorecardresearch

सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण

पूजा हेगडे व सलमान खान डेट करत असल्याची चर्चा

सलमान खान रिलेशनशिपमध्ये? ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीबरोबर डेटिंगच्या चर्चांना उधाण
सलमान खान दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा प्रेमात पडला असल्याच्या चर्चा आहेत. याआधी सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं होतं. आता तो दाक्षिणात्य अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. वयाने २४ वर्ष लहान असलेल्या पूजा हेगडेला सलमान डेट करत असल्याची चर्चा आहे.

पूजा हेगडे व सलमान खान डेटिंग करत असल्याच्या बातम्या अनेक वृत्त संस्थांनी दिल्या आहेत. परंतु, याबाबत अजून नेमकी माहिती समोर आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या निर्मिती कंपनीकडून आलेली दोन चित्रपटांची ऑफर पूजाने स्वीकारली आहे. त्यामुळेच सलमान खान व पूजा हेगडेच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा>> आधी कॉफी डेट अन् आता थेट लॉंग ड्राइव्ह; अक्षया-हार्दिकच्या रोड ट्रिपचा फोटो व्हायरल

उमर संधू नामक ट्वीटर अकाऊंटवरुन सलमान खान व पूजा हेगडेचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. “ब्रेकिंग न्यूज, मेगा स्टार सलमान खान पूजा हेगडेच्या प्रेमात आहे. त्याच्या निर्मिती कंपनीकडून पूजाला दोन चित्रपटांची ऑफरही मिळाली आहे. ते एकमेकांना डेट करत आहेत. सलमान खानच्या जवळच्या व्यक्तीकडून ही माहिती मिळाली आहे” असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटनंतर सलमान व पूजा डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा >> …अन् तेजस्विनी लोणारीच्या घरी पोहोचली ‘बिग बॉस’ची ट्रॉफी; फोटो शेअर करत अभिनेत्रीची भावूक पोस्ट

पूजा हेगडे सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान व पूजा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. पूजा ‘सर्कस’ या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 12:03 IST

संबंधित बातम्या