बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी कायमच आपल्या चित्रपटातून सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. ते लवकरच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली होती. यात मराठमोळा अभिनेता दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर नथुरामची भूमिका साकारत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. ज्यात दिग्दर्शकांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली आहे.

८० चं दशक गाजवणारे राजकुमार संतोषी यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की, “तुम्ही अनेकवर्षांपासून चित्रपट बनवत आहात मात्र हा विषय तुम्हाला आता का करावासा वाटला? काँग्रेस काळात बनवला असता तर कदाचित तुम्हाला प्रदर्शनात अडथळे आले असते? आज भाजपा, नरेंद्र मोदींचे सरकार तुम्ही घेतलीत?” यावर दिग्दर्शक राजकुमार संतोषी म्हणाले, “माझे करियर तुम्ही पाहू शकता, मी ‘घायल’ बनवला तो अ‍ॅक्शन चित्रपट होता तसे चित्रपट मी पुन्हा बनवू शकलो असतो पण मी ‘दामिनी’ बनवला. तो एक कोर्टरूम ड्रामा होता. महिलांच्या प्रश्नावर मी ‘लज्जा’ नावाचा चित्रपट बनवला.”

Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

…हाच माझा धर्म” सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील्सवर प्रसाद ओकची प्रतिक्रिया चर्चेत

ते पुढे म्हणाले, “मी ‘अंदाज अपना अपना’ हे तर पूर्ण विनोदी चित्रपट होता तो तर मी कोणतं सरकार आहे हे बघून नाही बनवला. मी या चित्रपटाचे लेखक आहेत त्यांनी मला एका नाटकाचा संदर्भ दिला ते नाटक मी जेव्हा वाचलं तेव्हा मला जाणीव झाली की गोडसेंवर अन्याय झाला आहे. त्याने स्वतःला हवाली केले त्याची शिक्षा त्याला मिळाली. मी वेळ किंवा मी कोणत्या पक्षाचं सरकार आहे हे बघून चित्रपट बनवला नाही.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली

ब्रेकवर असलेला आमिर खान, राजकुमार संतोषींच्या चित्रपटातून करणार कमबॅक; दिग्दर्शक म्हणाले…

दरम्यान ‘‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाची पटकथा दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांचं असून ए आर रहमान यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. या महिन्यात प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटप्रेमी आणि राजकुमार संतोषी यांचे चाहते या चित्रपटासाठी चांगलेच उत्सुक आहेत..