scorecardresearch

Premium

इलियाना डिक्रुझ करणार बॉलिवूडला राम राम; ‘या’ कारणासाठी अभिनेत्री घेत आहे अभिनयातून संन्यास

इलियानाच्या या निर्णयामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी त्यांची नाराजी व्यक्तदेखील केली आहे

ileana-dcruz-quitting-bollywood
फोटो : सोशल मीडिया

चित्रपट आणि खासगी आयुष्यातील घडामोडी यामुळे बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ ही कायम चर्चेत असते. मध्यंतरी लग्नाआधीच एका गोंडस बाळाला जन्म दिल्याने ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली होती. तिच्या बाळाचे नेमके वडील कोण अन् त्या बाळाचे संगोपन ती एकटीच करते का अशा गोष्टींचा मध्यंतरी तिने खुलासा केला होता. आता इलियाना एक वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आहे.

इलियाना मे महिन्यात मायकेल डोलनशी लग्न केल्याच्या चर्चा आहे व ती लग्नाआधीच गरोदर होती हेदेखील स्पष्ट झालं आहे. आता मात्र काही मीडिया रिपोर्ट्सनुसार असे सांगण्यात येत आहे की, इलियाना लवकरच अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करत आहे. यामुळेच ती कोणत्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारत नसल्याचंही समोर आलं आहे.

Rahul Gandhi in Amethi Bharat Jodo Nyay Yatra
पत्रकाराच्या मालकाची जात विचारल्यामुळे राहुल गांधी अडचणीत; पत्रकार संघटनांकडून निषेध
Buldhana Lok Sabha Constituency claimed by Vanchit Bahujan Aghadi which added to complexity of candidature
बुलढाण्यात ‘वंचित’च्या दाव्याने महाविकासआघाडीत पेच!
bhumi pednekar
भूमीला आईकडून मिळतं सोन्याचं नाणं…
Amol Kolhe in Loksabha Speech
“मी जय श्रीराम नक्कीच म्हणेन, पण…”, अमोल कोल्हेंचा लोकसभेत हल्लाबोल, मराठी भाषेतील काव्यात्मक भाषण चर्चेत!

आणखी वाचा : ‘जवान’ व ‘गदर २’ला मागे टाकत रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; जगभरात कमावले ‘इतके’ कोटी

डेक्कन हेराल्डच्या रीपोर्टनुसार लवकरच इलियाना तिच्या कुटुंबासह अमेरिकेत राहायला जाणार असून तिने चित्रपटसृष्टीला रामराम करायचं ठरवलं आहे. आपल्या अॅक्टिंग करिअरऐवजी आपलं बाळ व आपला पती यांच्याबरोबर वेळ घालवत आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचा इलियानाचा निर्णय पक्का झाला आहे अन् यामुळेच सध्या ती कोणत्याही चित्रपटाची ऑफरही स्वीकारत नाहीये.

इलियानाच्या या निर्णयामुळे तिचे चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांनी त्यांची नाराजी व्यक्तदेखील केली आहे. इलियानाने ‘बर्फी’, ‘रुस्तम’, ‘रेड’, मै तेरा हीरो’, ‘बादशाहो’सारख्या सुपरहीट चित्रपटात काम केलं आहे. नुकतंच इलियानाने तिच्या आगामी ‘तेरा क्या होगा लवली’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे ज्यात ती रणदीप हूड्डासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. अद्याप चित्रपटसृष्टीला रामराम करण्याबाबत अभिनेत्रीने कोणतंही अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Is ileana dcruz planning to quit acting career for this reason avn

First published on: 02-12-2023 at 17:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×