२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी फार चांगलं राहिलं नाही. यंदा अनेक बिग बजेट चित्रपट फ्लॉप झाले. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘रक्षा बंधन’, दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडाचा ‘लायगर’, वरुण धवनचा ‘भेडिया’ अशा अनेक चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नाही. मागच्या काही दिवसांत अनुराग कश्यप, करण जोहर या दिग्दर्शकांनीही बॉलिवूड चित्रपट का फ्लॉप होत आहेत, यावर भाष्य केलं. अशातच आता अभिनेता आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर यानेही याबाबत त्याचं मत नोंदवलं आहे. लोकांच्या चित्रपट पाहण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत आणि हे बदल समजून घेण्याची जबाबदारी कलाकारांची आहे, असं इशानने म्हटलंय.

हेही वाचा – तोतरं बोलायचा हृतिक रोशन; वडिलांचा विरोध पत्करून हृतिक बनला अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “माझ्या लहानपणी….”

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

“लोकांच्या चित्रपट पाहण्याच्या सवयी बदलल्या आहेत. बरेच लोक चित्रपट थिएटरमध्ये बघण्याऐवजी ओटीटीवर आणि इतर स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर पाहतात. लोक आता त्यांच्या आवडीनिवडी ठरवू लागले आहेत आणि हीच बाब आम्ही कलाकारांनी समजून घेणं गरजेचं आहे. लोक थिएटरमध्ये जाऊन बघण्याऐवजी कोणत्या प्रकारचे चित्रपट घरात बघून पाहणं पसंत करतील, याची कल्पना आपल्याला नाही,” असं तो ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना म्हणाला.

हेही वाचा – “सलीम-जावेद यांना सोडून आम्ही शाहरुख खान…”; बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्याबद्दल करण जोहरचं मोठं वक्तव्य, स्वतःलाही ठरवलं दोषी

पुढे इशान म्हणाला, “जेव्हा चित्रपट बनवण्याची गोष्ट येते, तेव्हा बॉलिवूडने कोणत्याही एकाच प्रकारच्या फॉर्म्युलाला चिकटून राहू नये. निर्मात्यांनी फक्त चांगला चित्रपट बनवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवं, बाकी काही नाही. एक काळ असा होता, जेव्हा एका विशिष्ट प्रकारचे फॉर्म्युला चालत होते, पण आता ते कालबाह्य झालंय. सध्याच्या घडीला तुम्ही तुमची कल्पकतेचा वापर करून चांगला चित्रपट बनवा, हाच एकमेव पर्याय आहे. बरेच लोक चांगले चित्रपट बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, हाच आशावाद ठेवला येईल,” असंही तो म्हणाला.

हेही वाचा – मुलानेच केली अभिनेत्रीची हत्या, मृतदेह फेकला माथेरानच्या जंगलात; धक्कादायक कारण आलं समोर

गेल्या महिन्यात अभिनेता इशान खट्टर, कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, पण हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही. इशानने अलीकडेच त्याचा आगामी चित्रपट ‘पिप्पा’चं शूटिंग पूर्ण केलंय. हा चित्रपट ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांच्यावर आधारीत असून यात इशान मुख्य भूमिका साकारत आहे.