‘दृश्यम २’ या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. तिने दिलेल्या या गोड बातमीमुळे तिचे चाहतेही कमेंट करत अभिनंदन करताना दिसत आहेत. इशिता दत्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत ती आणि तिचा पती अभिनेता वत्सल शेठ हे बीचवर बसल्याचे दिसत आहे. त्या दोघांनीही मॅचिंग कपडे घातले आहेत. यातील एका फोटोत वत्सल हा गुडघ्यावर बसून इशिताच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही एकमेकांकडे बघत आहेत.आणखी वाचा : “बाळाला असं पकडतात का?” लेकीला घेऊन पहिल्यांदा भारतात आलेली प्रियांका चोप्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले “हिला…” इशिता आणि वत्सलने या फोटोला 'बेबी ऑन बोर्ड' असे कॅप्शन दिले आहे. त्याबरोबर त्यांनी हार्ट इमोजीही शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या या गुडन्यूजनंतर अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आणखी वाचा : Video : प्रियांका चोप्रा लेकीला घेऊन पहिल्यांदा भारतात, चाहते म्हणाले “परिणीतीच्या लग्नासाठी…” दरम्यान इशिता दत्ता आणि वत्सल शेठ २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर आता ते दोघेही पहिल्यांदाच आई-वडील होणार आहेत. लग्नानंतर ६ वर्षांनी या जोडप्याने गुडन्यूज दिली आहे.