८० व ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये आलेल्या अनेक सिने-कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागला होता. यातलंच एक नाव म्हणजे जॅकी श्रॉफ होय. जॅकीदादा म्हणून ओळखले जाणारे जॅकी श्रॉफ यांना उदरनिर्वाहासाठी शेंगदाणे विकावे लागले. सधन गुजराती कुटुंबात जन्मलेल्या जॅकी श्रॉफ यांच्यावर ही परिस्थिती का ओढवली, याबाबत त्यांनी सांगितलं. तसेच मोठ्या भावाच्या निधनाबाबतही त्यांनी एका मुलाखतीत भाष्य केलं आहे. मुकेश खन्ना यांच्याशी गप्पा मारताना जॅकी श्रॉफ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जेव्हा त्यांना मुंबईतील तीन बत्ती इथे शौचालय वापरण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागायचे, तेही दिवस आठवले. ते केवळ शारीरिकदृष्ट्याच नाही तर भावनिकदृष्ट्याही अस्वस्थ करणारं होतं, असं ते म्हणाले. इतक्या अडचणी आल्यावरही फक्त आईच्या पाठिंब्यामुळे आपण हिंमत हरलो नाही आणि यश मिळवलं, असं जॅकी श्रॉफ सांगतात. याबद्दल 'डीएनए'ने वृत्त दिलंय. ३३ वर्षे ज्या चाळीत राहिले, तिथे जॅकी श्रॉफ यांनी दिली भेट; म्हणाले, “त्या चाळीसाठी माझ्या…” जॅकी श्रॉफ यांचे मूळ नाव जयकिशन काकूभाई श्रॉफ आहे. १ फेब्रुवारी १९५७ रोजी तत्कालीन बॉम्बेमध्ये जन्मलेल्या जॅकी श्रॉफ यांचे वडील गुजराती होते आणि आई कझाकिस्तानची होती. त्यांचे वडील एका समृद्ध गुजराती कुटुंबातील होते, पण शेअर बाजारात नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. ते मुंबईतील तीन बत्ती परिसरात एका चाळीत राहायचे. ते आयुष्यातील ३३ वर्षे त्या चाळीत राहिले होते. त्यांनी फक्त ११ वी पर्यंत शिक्षण घेतलं, नंतर त्यांनी कॉलेज सोडलं. करिअरमध्ये तब्बल १८० फ्लॉप चित्रपट देऊनही ‘हा’ अभिनेता कसा बनला स्टार? एका वर्षी केलेले सलग ३३ फ्लॉप सिनेमे 'लेहरेन रेट्रो'शी बोलताना ते म्हणाले, “मी माझ्या वडिलांना जाताना पाहिले, मी माझ्या भावाला जाताना पाहिले. मी व माझ्या आईने ते आमच्या डोळ्यांनी पाहिलं. मी अवघ्या १० व्या वर्षी हे सर्व पाहिलं. तो आघात होता. तो अजुनही माझ्या आत आहे. पण मला त्या जुन्या गोष्टी, ते आघात पुन्हा खोदून काढायचे नाहीत. कारण माझ्याजवळ जास्त काळ टिकणाऱ्या चांगल्या आठवणी आहेत. मी १० वर्षांचा होतो, माझा मोठा भाऊ १७ व्या वर्षी वारला. त्याने एका मित्रासाठी आपला जीव दिला, ही खूप मोठी गोष्ट आहे." https://www.instagram.com/p/CwzNmR2IgI_/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA== मिथून चक्रवर्तींनी १९८९ साली रचला होता ‘हा’ विक्रम; ३३ वर्षांनंतर अजूनही अबाधित दरम्यान, घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाला हातभार लावण्यासाठी जॅकी श्रॉफ लहान असताना चित्रपटगृहांच्या बाहेर शेंगदाणे विकत असे. ३३ वर्षे चाळीत राहणाऱ्या जॅकी श्रॉफ यांना खूप संघर्ष करावा लागला. नंतर ते अभिनय श्रेत्रात आले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचे स्वतःचे बंगले व गाड्या आहेत. त्यांचा मुलगा टायगर श्रॉफ हादेखील अभिनेता आहे.