जॅकी श्रॉफ हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आहेत, पण त्यांना हे यश इतक्या सहज मिळालेलं नाही. त्यांनी अगदी शेंगदाणे विकण्यापासून ते चित्रपटाची तिकिटं विकण्याचं कामही केलं. त्यांना प्रचंड संघर्षानंतर सिनेसृष्टीत यश मिळालं. आता एका मुलाखतीत जॅकी श्रॉफ यांनी चाळीतील आठवणींना उजाळा दिला आहे. जॅकी श्रॉफ व त्यांचे कुटुंब मुंबईच्या तीन बत्ती चाळीत राहायचे. यावेळी त्यांनी चाळीतील शौचालयाच्या रांगेत उभं राहावं लागायचं तेव्हाची आठवण सांगितली.

जॅकी श्रॉफ ३३ वर्षे त्या चाळीत राहिले होते. “मला अजुनही ती वर्षे आठवतात जेव्हा मी चाळीच्या शौचायलयाबाहेर रांगेत उभा राहायचो. तिथे सात लहान-लहान इमारती होत्या आणि त्या इमारतीतील सर्व लोकांसाठी तीन शौचालये होती. रोज सकाळी शौचालयाबाहेर रांग असायची कारण लोकांना कामावर जाण्याची घाई असायची. ही आठवण आजही माझ्या मनात ताजी आहे. कधी कधी मी स्वतःला त्या रांगेत उभा असलेला पाहतो,” असं रणवीर अलाहाबादियाला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफ म्हणाले.

‘शिंदेशाही’तील तारा निखळला, उत्कर्ष शिंदेने शेअर केली भावुक पोस्ट

चाळ सोडून इतकी वर्षे झाली, तरी या आठवणी अजुनही ताज्या आहेत, असं जॅकी श्रॉफ सांगतात. चाळीतील खोलीत आई रात्री जेवण बनवत असायची तेव्हा खाली बसून जेवण्याची आठवण त्यांनी सांगितली. “मी खाली बसून जेवायचो, माझ्या मते तीच जेवण करण्याची सर्वात चांगली पद्धत आहे. माझी आई स्वयंपाक करायची आणि मी खाली बसून जेवायचो. त्या आठवणी मी आजवर विसरू शकलेलो नाही,” असं ते म्हणाले.

“माझ्यावर १.२ कोटींचे कर्ज…”, अभिनेता गुरुचरण सिंग आर्थिक अडचणीत; ३४ दिवसांपासून अन्न नाही, कामही मिळेना

जॅकी श्रॉफ यांचा एक जुना व्हिडीओ काही काळापूर्वी व्हायरल झाला होता. ते त्यांच्या तीन बत्ती चाळीला भेट देण्यासाठी गेले तेव्हाचा हा व्हिडीओ होता. मुलाखतीदरम्यान जॅकी यांना हा व्हिडीओ व त्यांची जुनी खोली दाखवण्यात आली, तेव्हा त्यांनी तिथे राहायचे तेव्हाची आठवण सांगितली. “मी या खोलीत खाली झोपायचो. एकदा मला त्या खोलीच्या कोपऱ्यात एक साप दिसला होता, तर एकदा एका उंदराने मला आणि माझ्या आईचा चावा घेतला होता. हे मी ६० च्या दशकातलं सांगतोय,” असं जॅकी श्रॉफ म्हणाले.

अभिनेता राजपाल यादवची कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

काही चित्रपटांमध्ये अनेक लहान भूमिका केल्यानंतर जॅकी श्रॉफ यांना सुभाष घई यांच्या ‘हिरो’ (१९८३) चित्रपटात मुख्य अभिनेता म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. हा चित्रपट सुपरहिट झाला व जॅकी यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर त्यांनी ‘तेरी मेहेरबानिया’, ‘कर्मा’, ‘जबाव हम देंगे’, ‘राम लखन’ आणि ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटांतून सिनेसृष्टीत स्वतःला सिद्ध केलं. लवकरच ते ‘बेबी जॉन’ व ‘सिंघम अगेन’ मध्ये झळकणार आहेत.